August 7, 2026

विनापरवाना विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यास अटक

0

 nnनाशिक : सातपुरnnविनापरवाना विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या हॉटेल चालकास युनिट दोनच्या पथकाने सोमवारी (दि. १०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास कारवाई करून ताब्यात घेतले . त्याच्याकडून विदेशी मद्यसाठा व चारचाकी वाहन असा ५ लाख १४ हजार ९७३ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात सातपूर पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.nमोहित मुकेश छंगानी (२५, रा. पाथर्डी फाटा) असे मद्याची वाहतूक संशयित हॉटेल व बारचालकाचे नाव आहे. (दि. १०) रोजी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे युनिट दोनच्या पथकाने सातपूरमधील कार्बन नाका परिसरात सापळा रुचून छंगानीला वाहनासह ताब्यात घेतले. १४ हजार ९७३ रुपयांची विविध विदेशी मद्य जप्त करून पाच लाख रुपयांची सिल्व्हर रंगाची (एमएच- १५, इपी- ६८०१) कार जप्त केली. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सातपुर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *