August 7, 2026

ऑनलाइन पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून आमिष दाखवत महिलेस ६ लाख ४० हजार रुपयांना गंडा

0

ऑनलाइन पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून आमिष दाखवत महिलेस ६ लाख ४० हजार रुपयांना गंडाnnनाशिक : शहरnnऑनलाइन पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून आमिष दाखवत महिलेस ६ लाख ४० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मानगर परिसरात राहणारी ३४ वर्षीय महिला ऑनलाइन पार्टटाइम जॉब शोधत होती. टेलिग्राम ग्रुपवर मनी मेक सिम्पल या संकेतस्थळावरून त्यांना पार्टटाइम ऑनलाइन जॉब मिळाला. यासाठी संशयिताने त्यांना एका संकेतस्थळाची लिंक पाठविली.nnत्यावरील प्रक्रिया पार केल्यानंतर सदर महिलेला पार्टटाइम जॉब म्हणून ऑनलाइन हॉलिवूड व बॉलिवूडच्या चित्रपटांना परिक्षण मार्किंग व रेटिंग देण्याचे काम होते. सुरवातीला सदर महिलेला संशयितांकडून परतावाही मिळाला. परंतु काही दिवसांनी त्यांना रेटिंगचे पैसे मिळणे बंद झाले. त्यासाठी महिलेने संबंधित संशयितांकडे पाठपुरावा केला. त्या वेळी संशयितांनी त्यांना काही प्रक्रिया करण्यास सांगून त्यासाठी पैसे भरण्यास सांगितले. महिलेला यापूर्वी पैसे मिळालेले असल्याने तिने विश्वास ठेवून कामाचे पैसे परत मिळण्यासाठी संशयितांनी सांगितल्याप्रमाणे एकापेक्षा अनेक खात्यांवर पैसे ऑनलाइन जमा केले. अशारीतीने महिलेने ६ लाख ४० हजार ५४० रुपये विविध खात्यांवर जमा केले. परंतु संशयितांकडून या ना त्या कारणावरून पैशांची मागणी सुरूच राहिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सदर प्रकार ४ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान झाला. याप्रकरणी महिलेने नाशिक सायबर पोलिसात तक्रार दिली. अज्ञात संशयितांसह ज्या खात्यांवर पैसे जमा केले. त्या खातेदारांविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दानिश मन्सूरी तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *