बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेपnनाशिक : शहरnबालिकेवर लैंगिक करून तिला चार महिन्यांचा गर्भ राहिल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी असिफ अली अशरफ अली सैयद (३० रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड) यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.nजिल्हा व सत्र न्यायाधीश ओ. यू. कदम यांनी ही शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे सहायक अभियोक्ता दीपशिखा भिडे यांनी पुरावा सादर केला.nअभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, अरिंगळे मळा (नाशिकरोड) येथे एप्रिल २०२० पूर्वी सहा महिने अगोदर ही घटना पडली होती. आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे ४ महिन्यांचा गर्भ राहिला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी भादवि कायदा कलम ३७६, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ४, ६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक एम. बी. राऊत यांनी करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.nन्यायालयीन सुनावणीदरम्यान गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये भादंवि कलम ३७६ (३), ३७६ (२) (एन), ३७६ (२) (एफ) व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ६ मध्ये जन्मठेप व १० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने साचा कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.
