August 7, 2026

जेल रोड पाण्याच्या टाकी जवळ अचानक दंगल घडल्याने एकच धावपळ…… दंगेखोर पोलिस आमने सामने……

0

नाशिक : जेलरोडnnएकीकडे बाबासाहेब आंबेडकर जयंती ची तयारी, मुस्लिम बांधव यांचा सुरू असलेला रोजा आणि इतर सण जयंती यानिमित्ताने पोलिसांची धावपळ असते. या सर्व बंदोबस्त आणि धावपळीत गुरुवारी दुपारी जेल रोड येथील पाण्याच्या टाकीजवळ अचानक दंगल घडल्याचे कळताच एकच धावपळ झाली. दंगेखोर रस्त्यांवर येऊन दगडफेक करीत टायर जाळून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याची खबर मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिकचे पोलिस उप उपयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे, उपनगर वरिष्ठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश मायांकर, नासिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे आपल्या टीम सोबत दाखल झाले. वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन रस्त्याचा ताबा घेतला. घटनास्थळ येथून नागरिकांना बाजूला करण्यात येत होते. दंगा विरोधी पथक, अग्निशमन दल, मनपाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दला आणि एम्बोलेन्स सायरन वाजवीत आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली कधी असे घडले नाही म्हणून नागरिक काय झाले काही कळेना. दंगा घडल्यामुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले. दंगेखोर आणि पोलिस आमने सामने होते. पोलिस दंगे खोरांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते पण कुणीही एकत नसल्यामुळे पोलिस कठोर भूमिका घेत दंगा पथक आणि पोलिस दंगे खोर आमनेसामने झाले पण दंगेखोर आटोक्यात येत नव्हते म्हणून दंगे करणाऱ्यांवर पोलिसांनी अश्रू धुराच्या कांड्या फोडल्या पण त्याचाही उपयोग झाला नाही. वरिष्ठांच्या आदेशाने दंगे खोरांवर गोळीबार करण्यात आला त्यात एक इसम जखमी झाला आणि इतर पळून गेले. नाशिक महानगर पालिकेच्या रुग्णवाहिकेतून जखमी इसमाला उपचारासाठी पाठविण्यात आले. अग्निशमन दलाने रस्त्यावर जाळण्यात आलेले टायर पाण्याचा फवारा करीत आग विझविली. रस्त्यात ठिकठिकाणी दगडांचा पाऊस पडल्यासारखे दिसत होते. शेवटी सर्व आटोक्यात आल्यानंतर हा सर्व प्रकार जयंती आणि सणांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला पोलिसांचा एक मोकड्रिल्ल असल्याचे घोषित केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *