August 7, 2026

पोलिस उपनिरीक्षक व हवालदारांस ८ हजारांची लाच घेतांना अटक

0

अहमदनगर : एमआयडीसीnतक्रादार यांच्या मुला विरुद्ध अहमदनगर MIDC पोलीस ठाणे येथे विनयभंग व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्याने त्यात त्याला जामीन लवकर मिळण्या करिता मदत करू व न्यायालयाने म्हणणे मागितल्या वर लवकर देऊ असे सांगून तक्रारदार यांच्याकडून पोलिस उपनिरीक्षक व पोलिस हवालदार यांनी लाचेची मागणी केली. उपनिरीक्षक ज्योती मच्छिन्द्र डोके(परिविक्षाधीन ,वय- 26वर्ष, नेमणूक एमआयडीसी पोलीस स्टेशन अहमदनगर) यांच्यासाठी पोलिस हवालदार 720, संदीप रावसाहेब खेंगट ( वय- 46 वर्ष, नेमणूक एमआयडीसी पोलीस स्टेशन, अहमदनगर ) तक्रारदार यांच्याकडून गुरुवारी (दि १३ ) ८ हजार लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.nपोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक गायत्री जाधव, हवा. चंद्रशेखर मोरे, पो. ना. प्रकाश महाजन , पो.हवा. संतोष गांगुर्डे आदीच्यापथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *