August 7, 2026

कोतवाल व खाजगी इसमास १२ हजारांची घेतांना अटक

0

nnजळगाव : भुसावळnnयातील तक्रारदार यांनी सन 2022 मध्ये ता .भुसावळ जि . जळगांव मधील कुऱ्हे पानाचे या गावात स्वतःच्या नावे सु. 2 एकर. शेतजमीन विकत घेतली आहे. सदर शेत जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर तक्रादार यांचे स्वतःचे नावं लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुऱ्हे पानाचे येथे प्रकरण सादर केले होते. सदर प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी त्रुटी काढून तक्रारदार यांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटण्यास सांगितले होते . त्या प्रमाणे तक्रारदार हे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटले असत त्यानी तक्रारदार यांना मी तुमचे 7/12 च्या उताऱ्यावर नाव मंडळ •अधिकारी योगिता पाटील यांच्या कडून करून असे सांगून 15 हजार रुपयांची मागणी केली. या बाबत तक्रारदार यांनी दिनांक १८ मंगळवार ला. प्र. वि. जळगाव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी च्या अनुषंगाने पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील आलोसे क्र 1 रविंद्र लक्ष्मण धांडे (वय-54 वर्ष, कोतवाल, सजा तलाठी भुसावळ हल्ली नेमणूक तहसिल भुसावळ)nnयांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्या कडे प्रथम 15 हजार लाचेची मागणी केली.nn nn15 हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 12 हजार रु लाच रकमेची मागणी केली. आलोसे क्रमांक 2 खाजगी इसम हरिष देविदास ससाणे (वय-44 वर्ष, रा.आंबेडकर नगर भुसावळ ता. भुसावळ जि. जळगांव)nnयांचे कडे देण्यास सांगितले. यातील खाजगी इसम यांनी तक्रारदार यांचे कडून 12 हजार रुपये घेत. कोतवाल यांच्या क्रमांक 1 य स्वतः पंचासमक्ष स्वीकारले असता. रंगेहात पकडण्यात आले . दोन्ही इसमा विरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.nnसापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि संजोग बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकnnस.फौ. दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना. किशोर महाजन, , पो.ना. सुनिल पाटील, पो. कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. सचिन चाटे, पो. कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकुर आदीच्या पथकाने केलीnn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *