मंत्रालयात नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा
nnमुंबई : वृत्तnnमंत्रालयात लिपीक पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून सुमारे १६ लाख रुपये घेऊन तरुणीसह दोघांची फसवणूक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विशाल नारायण गोणभरे आणि शाम विठोबा खतकर या दोन भामट्यांविरुद्ध दादर पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. ३० वर्षांची तक्रारदार तरुणी ही दादर येथे राहत असून शाम खतकरने तो मंत्रालयात सचिव असल्याचे सांगत स्वतः चे आयकार्ड दाखविले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असून मंत्रालयात सध्या लिपीक, चालक आणि शिपाई पदासाठी भरती सुरु आहे. काही जागा शिल्लक असून तिथेच नोकरी मिळवून देतो असे सांगितले. त्यानंतर लिपीक पदासाठी परीक्षा होणार असून त्यासाठी प्रोसेसिंग फी, परिक्षेच्या पुस्तक, मेडकील आणि इतर कामासाठी त्यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी या दोघांनाही मे २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत सुमारे सोळा लाख रुपये दिले होते, मात्र या दोघांना नोकरी मिळवून दिली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने दादर पोलिसांत विशाल गोणभरे आणि शाम खतकर या दोघांविरुद्ध तक्रार केली
