दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक
नाशिक : शहरnnदोघा सराईत गुन्हेगारांना त्यांच्या इतर दोघा साथीदारांसह दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. ही घटना गुरुवारी (दि. २०) मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान वालदेवी नदीवरील रेल्वे पुलाखाली घडला गुड्डू उर्फ आतिश शांताराम चौधरी (वय १९), निकेश अशोक जाधव (वय ३३) राहुल अजय उज्जैनवाल (दोघे रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड), आकाश सुभाष इंगळे (वय २३, रा. म्हसोबानगर, चेहेडी पंपिंग स्टेशन) आणि आकाश गणेश दिनकर (वय १९, रा. रोकडोबा वाडी) संशयितांची नावे आहे. यापैकी राहुल उज्जैनवाल अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाला. मात्र, इतर चार संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले. रेल्वे पुलाखाली हे सर्व संशयित एकत्र जमलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकासह, ११२ पोलिस पथक, सिन्नर फाटा पोलीस चौकी बीट मार्शल असा मोठा फौजफाटा चार पोलिस वाहनांसह काही खासगी वाहनांनी रेल्वे पूल येथे दाखल झाला. पोलिसांनी परिसराला घेराव घातला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढला. मात्र, चार संशयितांना पोलिसांनी रात्रीच्या अंधारात ताब्यात घेतले.
