August 9, 2026

रेल्वेच्या समस्या तत्काळ सोडवा खा. हेमंत गोडसे

0

 nnnnनाशिक : पंचवटी एक्स्प्रेस रोज जाताना आणि येताना वेळेवर पोहोचावी. नाशिक – मुंबईदरम्यानचा प्रवास सव्वादोन ते अडीच तासांत व्हावा, मुंबईहून कसारामार्गे देशभरात धावणाऱ्या शंभर एक्स्प्रेसचा प्रवास गतिमान होण्यासाठी घाट परिसरात जमीन पातळीवर बोगदा उभारण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहे.nnमुंबईत आयोजित केलेल्या संसद सदस्य समितीच्या बैठकीनंतर खा. गोडसे यांनी मुंबई रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांची भेट घेतली. यावेळी गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक समस्यांचे विशेष निवेदन दिले. यामध्ये कसारा- इगतपुरी यादरम्यानच्या घाट परिसरातजमी पातळीवर उभारणी करावी.  जिल्ह्यातील चौदा क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारण्यात यावेत, राजधानी, गोदावरी, देवगिरी, जनशताब्दी, पंजाब मेल, अमृतसर या गाड्यांना देवळाली कॅम्प स्टेशन येथे थांबा देण्यात यावा. पंचवटी एक्स्प्रेसमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बोगी असावी, नाशिक- पुणे लोहमार्गासाठी प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत, लेव्हल क्रॉसिंग ८४ अ बारा तासांऐवजी २४ तासांचा करावा, नाशिक रोडच्या मालधक्क्यावर थांबत असलेल्या मालवाहू गाड्या शहराबाहेर नेण्यात याव्यात, या मागण्यांचा समावेश आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *