August 8, 2026

वीजमीटर नावावर करून घेत फसवणूक

0

वीजमीटर नावावर करून घेत फसवणूकnnnnनाशिक : मिळकत बळकवण्याच्या उद्देशाने भगूर परिसरात एका  संशयिताने मिळकत मालकाच्या नावाच्या बनावट सह्या करून त्याचे वीजमीटरच नावे करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानुसार एकावर देवळाली कॅम्प पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गोरख कचरू कोंबडे (रा. कोंबडे मळा, पाथर्डी, नाशिक ) असे संशयिताचे नाव आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक रमेश पंजाबी (रा. द्वारका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंबडे याने खोटा अर्ज एमएसईबी कार्यालयात सादर करून वीज कनेक्शन स्वतःच्या नावावर करून घेतले. अशोक पंजाबी यांची भगूरजवळील लहवित रोड येथे सर्व्हे नंबर ४०६ / १ / ब येथे घर, दुकान व गॅरेज अशी मिळकत आहे. या मिळकतीबाबत न्यायालयात खटला सुरू असून, गोरख कोंबडे यांनी पंजाबी यांची मिळकत बळकवण्यासाठी भगूर एमएसईबी कार्यालयात पंजाबी यांच्या नावाने कागदपत्रांवर बनावट सह्या करून त्यांच्या नावावर असलेले वीज कनेक्शन स्वतःच्या नावावर करून घेतले. सहाय्यक निरीक्षक पी. के. गिते तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *