आठ लाखांची खंडणी उकळल्याची प्रयत्न
आठ लाखांची खंडणी उकळल्याची प्रयत्नnn
नाशिक : शहरnबलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात बदनामी करण्याची भीती व चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीकडून आठ लाखांची खंडणी उकळल्याची घटना देवळाली कॅम्प येथे घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिसांनी एकास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश रमेशचंद्र अग्रवाल (रा. साई शांती भवन सोसायटी, नागझितरा लॅम रोड, देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संशयित महिला (वय ३०), रवी वाघ (वय ४०, दोघेही रा. गवळी वाडा, देवळाली कॅम्प ) व गणेश (वय ४०, रा. भुसावळ, जि. जळगाव) अशी आठ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या संशयिताची नावे आहेत. संगनमत करून फिर्यादी नीलेश अग्रवाल यांना एका महिलेवर वाईट कमेंट करता, तुला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू तसेच समाजात बदनामी करू अशी भीती घातली. त्यानंतर संशयित महिला , रवी वाघ व गणेश यांनी अग्रवाल यांना चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ व मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या तिन्ही संशयितांनी फिर्यादी अग्रवाल यांच्याकडून आठ लाख रुपयांची खंडणी उकळली. हा प्रकार दि. ९ ते १३ एप्रिलदरम्यान देवळाली कॅम्प येथे घडला. देवळाली कँम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला,
