मोबाईलच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या
मोबाईलच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्याnn
nnनाशिक : सिडको परिसरातून मोबाईलच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. नितीन गणपत जाधव (वय ३०) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात मयत युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तिघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नितीन गणपत जाधव (वय ३०) यास एक मोबाईल सापडला होता. सदर मोबाईल घेण्यासाठी आलेल्या निलेश दिनकर ठोके (३३ कामाठवाडे), त्याचा साथीदार प्रसाद शिरीष मुळे व अन्य एका साथीदाराने या तरुणाला जबर मारहाण केली होती. तू माझ्या पत्नीस फोन का करतो असे सांगत लोखंडी रॉडच्या साह्याने मारहाण केली होती.nnया मारहाणीत जखमी नितीन गणपत जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार घेत असताना २३ एप्रिल रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मृत नितीन जाधव यांचे वडील गणपत जाधव यांच्या फिर्यादीहून अंबड पोलीस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नितीन जाधव या तरुणाचा मृत्यू झाल्याने अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपात विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पुढील पोलीस तपास करीत आहेत.
