August 8, 2026

महापालिकेची इंटरनेट सेवा विस्कळीत

0

nनाशिक : बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने महापालिकेची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये होत असलेल्या कर वसुलीवर त्याचा परिणाम दिसून आला. मंगळवारी (ता. २५) रात्री उशिरापर्यंत सेवा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकन हायजॅकरने महापालिकेच्या वेबसाईटवर हल्ला करून क्रॅक करण्याचा प्रयत्न केला होता. तसाच प्रकार मागील आठवड्यातही उघडकीस आला. याबाबत महापालिकेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली. सोमवारी (ता. २४) पुन्हा इंटरनेटच्या संबंधित व्यवस्थेत गोंधळ निर्माण झाला. बीएसएनएलच्या इंटरनेट कनेक्शनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने महापालिका मुख्यालयासह सहाही विभागात नागरिकांना इंटरनेटच्या साहाय्याने पुरविल्या जाणाऱ्या विविध सुविधांचे कामकाज ठप्प झाले. सर्वाधिक परिणाम घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर झाला. महापालिकेने सध्या घरपट्टी व पाणीपट्टीसाठी सवलतीचे दर लागू केले आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांत गर्दी होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *