August 9, 2026

पोलीस पदक विजेते पदक जाहिर पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांना पदक जाहीर

0

नाशिक : शहरnnराज्याचे पोलीस महासंचालक पोलीस पदक विजेत्यांची बुधवारी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी यादी घोषित केली आहे. त्यामध्ये नासिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे २५ जणांचा समावेश आहे.nnमहाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक हे घोषित केले जाते यावर्षी ८०० पोलीस कर्मचाऱ्यांना हे पद घोषित झाले आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २५ जणांचा समावेश आहे.nनाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांचा समावेश आहे. त्यांच्यासमवेत पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस अकादमी मधील सुभाष गुंजाळ, पिंटू मोगरे सुनील ताकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील शंकर गोसावी, काशिनाथ गायकवाड, नाशिक ग्रामीण मुनीर सय्यद, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नागरी हक्क संरक्षण विभागाचे अशोक जगताप, ज्ञानेश्वर शेलार, जयवंत सूर्यवंशी, प्रतिबंधक विभागाचे प्रकाश डोंगरे, अमोल मानकर, कुणाल काळे, चेतन मोठे, संतोष उशीर, इमरान शेख, सोमनाथ निकम, गजानन पाटील, निलेश भोईर, विशाल साबळे, गणेश वाघ, शामकांत पाटील आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.nnमहासंचालकांचे पोलीस पदक मिळालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *