August 8, 2026

कोपरगावचा तहसलीदार व खाजगी इसमास लाच घेतांना अटक

0

nनाशिक : तक्रारदार यांच्या वाळू वाहतूकीच्या गाडीवर कारवाई न करण्याकरिता यातील खाजगी इसम गुरमीत सिंग दडियल ( वय 40 वर्ष. रा. कोपरगाव)nयांने तहसीलदार विजय जबाजी बोरुडे (वय 44 वर्षे नेमणूक- तहसीलदार कोपरगाव) यांच्या करिता 20 हजार रुपयेची लाचेची मागणी करून नमूद लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तहसीलदार यांनी नमूद लाचेचे मागणीस प्रोत्साहन दिले असून लाचेची रक्कम स्वीकारताना खाजगी इसमास लाचलुजपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दोन्हीसंशयिता विरुद्ध कोपरगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.nपोलीस अधीक्षक, ला.प्र.वि शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, उप अधीक्षक नरेंद्र पवार,पोलीस उप अधीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, . ह. पंकज पळशीकर ,पो.ना. नितीन कराड,पो.ना. प्रवीण महाजन, पो. ना प्रभाकर गवळी , चालक संतोष गांगुर्डेnलाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *