August 8, 2026

चढ्या दरात नाथजलची विक्री नाशिकच्या विक्रेत्यावर महामंडळाची कारवाई…

0
n

नाशिक रोड बस स्थानकातील विक्रेता पंधरा रूपयांची नाथजलची बाटली वीस रूपयांना विकत असल्याची चित्रफीत व्हायरल झाली आहे. संबंधित चित्रफित व्हायरल झाल्यानंतर महामंडळाने त्याची दखल घेत संबंधित जागा भाड्याने दिलेल्या मे.शेळके बेव्हरेजेस प्रा.लि. पुणे यांना पत्र लिहीले आहे. त्यात त्यांनी तुम्ही नेमलेल्या प्रतिनिधी अव्वाच्या सव्वा दरात नाथजल विकत आहेत, तसेच प्रवाशांना अर्वाच्च भाषेत उत्तरे देत आहेत. त्यामुळे संबंधिताचा परवाना तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावा व नव्याने प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात यावी.कडाक्याचा उन्हाळा सुरू असताना एसटीच्या प्रवाशांना महामंडळाच्या जागेवर उभ्या असलेल्या नाथजल या बाटलीबंद पाण्याची बाटली विक्रेत्यांकडून अक्षरश: नाडले जात आहे. कुलिंग चार्जच्या नावखाली पंधरा रूपयांच्या नाथजल बाटली बंद पाण्याची विक्री चक्क 20 रूपयांना केली जात आहे. याबाबत नाशिक रोड बसस्थानकातील संबंधित नाथजल विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होताच एसटी महामंडळाने त्याची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.एसटीच्या प्रवाशांना माफक दराने पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी एसटीने ‘नाथजल’ हा ब्रॅंड आणला आहे. या योजनेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना काही स्टॉलधारकांकडून प्रवाशांची अडवणूक होत आहे.

n

n

n

n

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *