सोशल मिडियाच्या माध्यमातुन महिलांचे न्युड फोटो नातेवाईकांमध्ये प्रसारीत करणा-या इसमास अटक
nn
nnनाशिक : शहर हद्दीतील महिला व मुलींच्या बाबतीत सोशल मिडियाच्या माध्यामातुन घडणा-या सायबर गुन्हयांना प्रतिबंध व आळा घालणेबाब सुचना दिल्या होत्या.nnसायबर पोलीस स्टेशन, येथे मार्च २०२० मध्ये एका महिलेने तक्रार दिली की, तिची सोशल मिडियाच्या माध्यमातुन एका अनोळखी इसमाची ओळख झाली. पिडीत महिलेशी प्रेम असल्याचे भासवुन विश्वास संपादन करून तिचे न्युड फोटो देण्यास भाग पाडले. सदर फोटो पिडीतेच्या पती व नातेवाईकांना व्हॉटसअॅप द्वारे पाठवुन, पुन्हा न्युड फोटो नातेवाईकांना प्रसारीत न करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करुन ब्लॅकमेल केले. सदरचे पैसे स्विकारुन वांरवार पैशांची मागणी करुन शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार दिल्यावरुन सायबर पो.स्टे., नाशिक शहर येथे गुरनं. ३२ / २०२०, भादंवि ३५४ (ड), ३८४, ५०४, ५०६ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ (अ) प्रमाणे दि. ०६/०३/२०२० रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता.nnसदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीताचे नांव व पत्ता तांत्रिक विश्लेषणावरुन निष्पन्न करण्यात आले होते. आरोपी नामे मृत्युंजय उर्फ अंशुमन राजेश पटेल, वय २४ वर्षे, रा. ठी. गवापुर, बेलथर रोड, जि. बलिया, उत्तरप्रदेश हा सन २०२० पासुन आजपावेतो स्वतःचे अस्तित्व लपवुन विविध मोबाईल क्रमांक व सोशल मिडियाच्या बनावट प्रोफाईल वरून फिर्यादी यांचेशी संपर्क करून त्रास देत होता. सदर आरोपीताच्या शोधाकरीता तपास पथक राहत्या पत्त्यावर गेले असता, त्यास तपास पथकाची माहिती प्राप्त झाल्याने तो तपास पथकास चकमा देवुन पळुन गेला होता. त्याने स्वतःचे सर्व सोशल मिडिया खाते व मोबाईल क्रमांक बंद केले होते. सायबर पथकाने तांत्रिक व व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आरोपी सतत वाराणसी, सुरत, व मोरबी या गुजरात राज्यात स्वतःचे अस्तित्व लपवुन वेळोवेळी स्वत:चे राहते ठिकाण बदलत असल्याचे माहिती प्राप्त केली होती.nnमा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे वपोनि / डॉ. सिताराम कोल्हे यांनी तपास पथकातील सपोनि / सुरेश कोरबु, सोबत पोहवा / १५०३ किरण जाधव, पोना / १०३१ संतोष काळे, चालक पोशि/ २४७२ विकास पाटील यांच्या मदतीने तांत्रिक व व्यावसायिक कौशल्याचा वापर करुन मोठ्या शिताफीने आरोपीस रंगपारबेला, जि. मोरबी, राज्य गुजरात येथुन दिनांक १९/०५/२०२३ रोजी ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. त्यास मा. न्यायालयाने तपासकामी ४ दिवस पोलीस कोठडी दिली आहे. सदर तपासा दरम्यान त्याने यापूर्वी ४ ते ५ महिलांना अशाच प्रकारे गुन्हयाच्या पध्दतीने शारिरीक व मानसिक त्रास दिल्याचे दिसुन आले असुन त्याबाबत गुन्हयाचा सखोल तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत.nn
