October 8, 2026

आज बारावीचा निकाल

0

nnपुणे :राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी २ वाजता ऑनलाईन स्वरुपात जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य बोर्डाकडून बुधवारी येथे देण्यात आली. -nnअन्य शिक्षण मंडळांचे बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यावर राज्यभरातील लक्षावधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना राज्य बोर्डाच्या बारावीच्या निकालाची प्रतीक्षा होती. मे महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होईल, अशी माहिती सांगितली जात होती.nnव उच्च व माध्यमिक शिक्षण 3 माध्यमिक मंडळ पुणे • महाराष्ट्रnnमात्र, मे महिन्याच्या अगदी अखेरीऐवजी राज्य बोर्डाने २५ मे रोजी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करून सुखद धक्का दिला आहे राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च २०२३ दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या मार्फत घेण्यात आली होती.nnपुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत राज्यभरातून १२ लाखांच्या आसपास विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने इयत्ता बारावीचा निकाल महत्त्वाचामानला जात असल्याने सर्वांनाच निकालाच्या तारखेची उत्सुकता होती. राज्य मंडळाने गुरुवारी (२५ मे) निकाल जाहीर होईल, अशी माहिती दिल्याने या सर्वांना दिलासा मिळाला आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील तसेच त्यांची प्रिंट घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *