August 8, 2026

भावाची घसरण थांबविण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करा

0

nnनाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सतत पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कांदा लागवडीचा खर्चही सुटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तातडीने कांद्याच्या भावात होणारी घसरण न थांबल्यास जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जातील अशी भिती व्यक्त करत कांदा खरेदी लवकरात- लवकर सुरू करावी अशी सूचना वजा आदेश खासदार हेमंत गोडसे यांनी नाफेड प्रशासनाला दिला आहे.nnमागील गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत आहे. जिल्ह्यातील दहा बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक असून शेतकऱ्यांना हवा तसा बाजारभाव मात्र मिळत नाही. सर्वच बाजार समित्यांमध्येnnकांद्याला कमीत कमी साडे तीनशे तर जास्तीत जास्त एक हजाराच्या आसपास भाव मिळत आहे. आज मितीस शेतकऱ्यांना सरासरी साडे सहाशे रुपये इतकाच भाव कांद्याला मिळत आहे. लागवडीसाठीचा खर्च सुटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत कांद्याला मोठी भाववाढ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती.nnकाल खा. हेमंत गोडसे यांनी पिंपळगाव येथील नाफेड कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कमी का मिळतो, शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी याविषयीचा आढावा खा. हेमंत गोडसे यांनी नाफेडचे निखिल पठाडे यांच्याकडून घेतला. शेतकऱ्यांना अधिकचा मिळणे अत्यंत गरजेचे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *