October 8, 2026

जोपूळ शिवारातील द्राक्ष बाग तोडून नुकसान करणारे संशयित गजाआड वणी पोलीस स्टेशनची कामगिरी

0

nnदिंडोरी : तालुक्यातील जोपूल गावचे सरपंच व प्रगतशील शेतकरी माधव खंडेराव उगले यांचे शेतातील बागांमध्ये गेल्या दोन महीन्यांपासून काही अज्ञात इसम हे रात्रीच्या वेळी द्राक्षांची झाडे कापून नुकसान केल्याची घटना घडली होती. दिनांक २० में २०२३ रोजी देखील रात्रीचे सुमारास उगले यांचे शेतातील ८० द्राक्षांची झाडे जमीनीपासून तोडून नुकसान करण्यात आले होते. तसेच द्राक्ष बागेत पावडर मारण्यासाठी ठेवलेले ब्लोअर मशीनची ८ पितळी फुले आणि सूर्या कंपनीचा वजनकाटा असा एकूण ३२ हजार ५००/- रु. किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लबाडीच्या इराद्याने चोरून नेला होता. याप्रकरणी वणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.nnसदर घटनेमुळे जोपूळ गावातील द्राक्ष बाग शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार अशा घटना घडत असल्याने जोपूल गावचे सरपंच व शेतकरी वर्गाने पोलीस अधीक्षक कार्यालयात येवून सदर प्रकरणाचा तातडीने छडा लावावा यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेतली होती. अधीक्षकांनी तात्काळ दखल घेवून वणी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सुचना दिल्या होत्या.nपोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांचे पथक जोपूल गावचे परिसरात रात्रंदिवस गस्त घालून पाळत ठेवून संशयितांचा शोध घेत होते.nnसंशयितांची गुन्हा करण्याची पध्दत व उपलब्ध पुराव्यांच्या विश्लेषणावरून मिळविलेल्या गुप्त बातमीच्या आधारे वणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेnसंशयीत नामे १) ऋषीकेश आंबादास वाघ, वय २०, २) रावसाहेब सुर्यभान आहिरे, वय २५, ३) रोहीत बाळु बनकर, वय २१ तिघे रा. जोपूळ, ता. दिंडोरी यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेले संशयीतांना वरील घटनेच्या अनुषंगाने विश्वासात घेवून चौकशी केली असता . तिघांनी मिळून वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयात नमूद संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेला मुद्देमाल, तसेच त्यांचेसोबत अजून किती साथीदार होते . अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहे काय याबाबत वणी पोलीस पथक पुढील तपास करीत आहेत.nnनाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग सुर्यवंशी यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थागुशाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, वणी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, पोकॉ किरण धुळे, पोना जगदीश झाडे, किरण गांगुर्डे, आण्णा जाधव, कुणाल मराठे, निलेश सावकार, प्रदीप शिंदे, भगवान उदार, पोकॉ शाम राऊत, दिलीप राऊत, राहुल आहेर, तसेच स्थागुशाचे पोना हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे.nnपोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी तपास पथकास १० हजार रू. चे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *