August 8, 2026

ॲट्रॉसिटी दाखल असलेला संशयित आरोपी धीरज मगर पोलिसांच्या ताब्यात

0
    n

  1. शिंदे गट शिवसेनेचा महिला आघाडीच्या पद वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना लक्ष्मी ताठे व शोभा मगर यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती या चकमकीच पुनर्वसन जातीवादी शिवीगाडीत व मारहाणीत झालं. यासंदर्भात मुंबई नाका पोलीस स्टेशन अंतर्गत ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार शोभा मगर व धीरज मगर यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवराय नोंद करण्यात आली. फिर्यादी लक्ष्मी ताठे यांना मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये शोभा मगर व धीरज मगर यांनी शिवीगाळ केल्या प्रकरणाचा व्हिडिओ पोलीस स्टेशनच्या सीडीआर मध्ये आहे घटनास्थळी संशयित पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ करत होता मात्र पोलिसांनी त्यावेळी धीरज मगर व शोभा मगर यांना अटक केली नाही. ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाल्यानंतर शोभा मगर व धीरज मगर यांनी पोलीस स्टेशन मधून पळ काढला. शोभा मगर व धीरज मगर पोलिसांसमोर पळून गेले मात्र पोलिसांनी चकार शब्दाविषयी त्यांना विचारले नाही या उलट पालकमंत्री खासदार यांचे फोन शोभा मगर व धीरज मगर च्या बचावासाठी पोलिसांना आल्याची माहिती हाती लागले आहे. याप्रकरणी नाशिक न्यायालयाने शोभा मगर व धीरज मगर यांचा जामीन फेटाळला तरी जामीन मंजूर करण्यासाठी शोभा मगर व धीरज मगर यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली मात्र हायकोर्टानेही जामीन नामंजूर केला व पोलिसांना संशयित आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. जामीन नाकारल्यानंतर लक्ष्मी ताठे यांनी पत्रकार परिषद घेऊन संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली तरीदेखील पोलिसांनी संशयित आरोपी अटक केले नाही . शेवटी आज दिनांक 12 जुलै रोजी स्वतः लक्ष्मी ताठे यांनी धीरज मगरचा पाठलाग केला त्याची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली पोलीस संशयित आरोपी अटक करायला अटक करायला तयार नव्हते अखेरीस फिर्यादी लक्ष्मी ताठे यांनी काट्या मारुती पोलीस चौकी जवळ संशयित आरोपीची गाडी अडवून त्याला पोलिसांच्या हवाली केले ही सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. संशयित आरोपी धीरज मगर याला एसीपी यांच्यासमोर हजर करून त्याला मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले आहे मुंबई नाका पोलीस ठाण्यात जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी लक्ष्मी ताठे यांनी धीरज किरण मगर व शोभा मगर यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.मुंबई उच्च न्यायालयाने दोघा संशयतांना अटक पूर्व जामीन फेटाळून अटक करण्याचे आदेश देऊनही मुंबई नाका पोलिसांनी महिना ओलांडून गेल्यावर सुद्धा धीरज मगर व शोभा मगर यांना पोलिसांनी अटक केली नाही.या पार्श्वभूमीवर मुंबई नाका येथे लक्ष्मी ताठे यांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी केल्यानंतर आज धीरज किरण मगर याला पोलिसांनी काट्या मारुती चौक येथे अटक केली असून शोभा मगर या अद्याप फरार आहे..
  2. n

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *