August 8, 2026

राष्ट्रवादीची वळू बैल शेतकऱ्यांच्या शेतावर सोडू नका, अन्यथा त्यांना देखील आम्ही यांना ठेचून काढू – सदाभाऊ खोत

0

सतिश रुपवते नाशिकnn३० एप्रिल २०२४ पर्यंत राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणारी अधिसूचना राज्य शासनाने जारी केला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी बंदीविषयक नुकतीच अधिसूचना काढली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.nnhttps://youtu.be/cI4V4ZQZfEwnnते म्हणाले, महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या कांडीला यावर्षी सोन्याचा भाव मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या उसाला भंगाराचा भाव द्यायचा, हे सरकारने ठरवलं आहे.nnआमच्या बापान आमच्या लेकरा बाळांनी कष्ट करून पिकवलेला ऊस हा आम्ही साखर कारखान्याला द्यावा की कर्नाटकाला द्यावा की गुजरातला द्यावा ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या मायबाप शेतकऱ्याला आहे. परंतु दोन पैसं शेतकऱ्याला मिळायला लागलं की सरकारच्या पोटात दुखायला लागतंय. या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *