आदिवासी समाजावरील अन्याय दूर करावा पीआरपीचे निवेदन
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार पाहण्यास मिळत आहे. गावातील काही जातीवादी समाजकंटक आदिवासी समाजावर हल्लेकरून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत त्यांना दम देऊन जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत गाव सोडण्यास भाग पाडत आहे.nnअशीच एक ताजी घटना इगतपुरी तालुक्यातील दारणा नांदगाव येथे घडली आहे. आदिवासी भिल्ल समाजातील लक्ष्मण रामदास पवार या व्यक्तीला गावातील जातीवादी समाजकंटकांनी गावाच्या वेशीला बांधून जबर मारहाण करून गाव सोडून जाण्याचा दम दिला आहे. तसे न केल्यास त्याला जीवे ठार मारू असा इशारा देखील दिला आहे.nnअशाच प्रकारचा अन्याय हा प्रत्येक गावात आदिवासी समाजावर अशा जातीवादी लोकांकडून होतो. आदिवासी समाज्याच्या जमिनीची लूट हे समाजकंटक करत आहे.nत्यामुळे आदिवासी लोकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आपली बाजू कुठे मांडायची? कुठे न्याय मिळवायचा? स्थानिक पोलीस ठाण्यात गेल्यावर त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही. त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळतात. आणि न्याय मिळत नाही.nतसेच वर्षानुवर्षे वनजमीन धारक यांना वनहक्क कायदा 2006 लागू असून देखील वनाधिकार कायद्याची हेळसांड करणारे आणि आदिवासी जनतेच्या भावनेशी खेळणारे फॉरेस्ट अधिकारी यांच्यावर वनहक्क कायद्या अंतर्गत कलम 7 अन्वये गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आदिवासी जनतेस न्याय मिळाला पाहिजे.nयासर्व विषयांचा आपण गांभीर्याने विचार करून यांची दखल घ्यावी आणि आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा ही आपणास या निवेदनाद्वारे विनंती आहे.
