वालदेवी नदी पात्रात तिघांचा बुडून मृत्यू एक महिला दोन महाविद्यालयीन तरुण
नाशिकरोड येथे गणपती विसर्जनाला गालबोट लागले. वालदेवी नदी पत्रात तीन जणांचा बुडून मृत्यु झाला असून त्यात दोन महाविद्यालयीन तरुणाचा समावेश आहे.nnनाशिकरोड सिन्नर फाटा चेहडी शिव येथील empire marvel या इमराती मधील सर्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जन साठी प्रसाद सुनील दराडे (वय 18) हा आपला मित्र रोहित वैद्यनाथ नागरगोजे (वय 22, रा. हरी संस्कृती, खर्जूल मळा, नाशिकरोड) चेहडी येथील संगमेशर येथे गेले होते. मागील काही दिवसापासून मूकबल पाऊस असल्याने नदी पात्र ओसंडून वाहत होते.nnयावेळी प्रसाद दराडे हा पाण्याजवळ गेल्याने त्याचा पाय घसरून पाण्यात पडला व पोहता येत नसल्याने पाण्यात तो बुडू लागला. तेव्हा शेजारी असलेल्या रोहित नागरगोजे याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघे जण डुबून वाहून गेले. नदी पत्राचे वाकडेतीकडे वळण, मोठे दगड यांचा मार लागून दोघे जखमी झाले. पाण्यात वाहत येत असल्याचे पाहून बंदोबस्त साठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक रामदास विंचू यांनी सहकारी व नागरिकांच्या मदतीने एक एकना बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात रवाना केले.
