३० ऑक्टोंबर पासून “आमरण उपोषणाचे राज्यव्यापी आंदोलन”!
Satish Rupwatennमहाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक ३० ऑक्टोंबर २०२३ सकाळी १०:०० वाजले पासून “आमरण उपोषणाचे राज्यव्यापी आंदोलन”!nnमहाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर बैठक झाली होती या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचे बहुतांश प्रश्न मार्गी लावणे संबंधीच्या सूचना व आदेश नगर विकास विभाग, वित्त विभाग, आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन यांना दिले होते. परंतु मुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर झालेल्या चर्चे नंतर ७ महिने पूर्ण होऊनही यावर अद्यापही कोणतीही कारवाई संबधित विभागांनी केलेली नाही. संघर्ष समितीच्या माध्यमातून वारंवार याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. ज्या ज्या वेळेस मा आयुक्त तथा संचालक कार्यालयामध्ये सन्माननीय आयुक्त तथा संचालक पूर्ण पुणे सकारात्मक मात्र संबंधित अधिकारी यांना या विषयावर चर्चा करणे कामी संघटनेचे पदाधिकारी गेले असता त्यांच्याकडे बोलायला वेळ नसणे उदासीन भाव दिसून आला. आणि ही निगेटिव्ह वृत्ती कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी दिसून आली आणि म्हणून या वृत्ती विरुद्ध आवाज उठविण्यासाठी दिनांक ३० ऑक्टोंबर २०२३ पासून सकाळी १०:०० वाजता मा. आयुक्त तथा संचालक कार्यालय बेलापूर, नवी मुंबई येथे बेमुदत “आमरण उपोषण” करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देणेबाबत औरंगाबाद खंडपीठाने जो स्थगिती आदेश दिला आहे तो त्वरित निकाली काढावा व शासनाने या कामी ठोस भूमिका मांडून राज्यातील सर्व बौद्ध मातंग व इतर सर्व समाजांचा वारसांना वारसा हक्काची नियुक्ती मिळणे कामी न्याय मिळवून द्यावा, प्रलंबित अनुकंपाची भरती त्वरित करावी. शासनाने नवीन निर्माण केलेल्या नगरपंचायत व नगरपरिषदेमधील सर्व कर्मचाऱ्यांची उद्घोषणे पुर्वीचे उर्वरित सर्व कर्मचारी यांना विना शर्त विना अट कोणतीही शैक्षणिक अहर्ता ची अट न घालता समावेशन करावे, तसेच नगरपंचायतीमधील सर्व सफाई कर्मचारी यांची आकृतीबंध मंजूर करून सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करावे अथवा सेवेत असताना मयत झाले असल्यास त्यांच्या वारसांना वारसा हक्काने अथवा अनुकंपा खाली त्वरित नियुक्ती द्यावी. स्वच्छता निरीक्षकांचे विकल्प त्वरित मागवावेत व त्यांचे समावेशन त्वरीत करावे करावे, कंत्राटी ठेकेदार कर्मचारी यांना किमान वेतन द्यावे व त्यांना सेवेत कायम करावे १० , २०, ३० अश्वासित प्रगती योजनेचा लाभ त्वरीत लागू करणे बाबत, संवर्ग कर्मचारी यांचे पदोन्नती बाबत , बदली बाबतचे अडचणी , वेतन , निवृत्ती वेतन, निवृत्ती नंतरची देणी या व इतर मागण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे . संघर्ष समिती मुख्य निमंत्रक डॉ डी एल कराड, अँड.सुरेश ठाकूर,डी.पी. शिंदे,रामगोपाल मिश्रा,अनिलजी जाधव,मुख्य संघटक संतोष पवार,अँड.सुनील वाळूजकर .महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती चे सर्व पदाधिकारी
