रचना विद्यालयाचे नुकसान होऊ देणार नाही:तिमटी दहातोंडे
*नासिक वार्ताहर- रचना विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी आम्ही दोन पावले मागे येऊन पुन्हा विद्यालयाशी करार नामा नूतनीकरण करण्यास तयार आहोत आता याबाबतचा निर्णय हा रचना विद्यालयाने आणि करारनामा करून घ्यावा असे आवाहन नाशिक डायोसेशन असोसिएशन ट्रस्ट चे सल्लागार तिमटी दहातोंडे यांनी केले आहे.*nn*मागील काही दिवसापासून रचना महाविद्यालय आणिनाशिक डायोसेशन असोसिएशन ट्रस्ट यांच्यामध्ये वाद सुरू आहे या वादाच्या पार्श्वभूमी वरती ट्रस्टचे सल्लागार तिमटी दहातोंडेभूमिका स्पष्ट करताना म्हणाले की आज मराठी शाळा वाचल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पण प्रयत्न करीत आहोत अनेक आमच्या विश्वस्त मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी या शाळेमध्ये शिकले आहेत परंतु शाळा आणि त्यांचे विश्वस्त मंडळ हे अतिशय चुकीच्या मार्गाने आमच्या ट्रस्ट बाबतीमध्ये अपप्रचार करीत आहे तो अपप्रचार त्यांनी त्वरित बंद करावा आणि नियमाप्रमाणे करारनामा करून घ्यावा व आत्तापर्यंत राहिलेले सर्व भाडे हे दिले जावे अशी मागणी करून दहा तोंडे पुढे म्हणाले की आत्तापर्यंत आम्ही धर्मदाय आयुक्त व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तसेच शिक्षण विभागाच्या माध्यमातून वारंवार रचना विद्यालयाच्या विश्वस्त मंडळाला विनंती करत आहोत परंतु या विनंतीकडे ते दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जर त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केला नाही तर नाईलाजाने कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा देऊन दहातोंडेनी पुढे सांगितले की, रचना विद्यालयाच्या विश्वस्त मंडळाने प्रशासनाची कोणतीही दिशाभूल करू नये कारण यापूर्वी त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न करून बघितले परंतु त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ झालेले आहेत त्यामुळे त्यांनी आता नाशिक डायोसेशन असोसिएशन ट्रस्ट बरोबर चालू असलेला वाद हा संपवण्यासाठी दोन पावले मागे यावे जसे आम्ही मागे आलो आहोत तसे त्यांनी पुनर्विचार करावा असे आवाहन त्यांनी केले आहे*
