फटाक्याच्या वादातून नाशिक मध्ये खून
नाशिक मध्ये किरकोळ कारणावरून वाद होतात आणि त्याचा परिवसन खुनात होतं किरकोळ कारणावरून नाशिक मध्ये खुन होतो. काय कारण असावे पोलिसांना गुन्हेगार घाबरत नाहीत का ? नाशिककरांवर पोलिसांचा धाक राहिला नाही का ? इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवाळीच्या दिवशी एका 28 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने सभासद वार करून हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.nnhttps://youtu.be/EvYvhnz8I2o?si=8TKm0xM9KJlF59tKnnफटाके वाजविण्याच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पुढे आली आहे. पाथर्डी गावातील स्वराज्य नगर येथे फटाके वाजविण्याचा वाद मंगळवारी गौरव आखाडे व बबन यादवराव शिंदे व नारायण बबनराव शिंदे यांच्यात झाला. लहान मुले दसकतील म्हणून गौरव आखाडे बबन शिंदे व नारायण शिंदे यांना तुम्ही फटाके मैदानात वाजवा असे सांगण्यात गेला होता. मात्र याचाच राग धरून बबन शिंदे व नारायण शिंदे यांनी रागाच्या भरात गौरव आखाडे वर धारदार शस्त्राने सपासप वार केले यात गौरव आखाडेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संशयतांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर पोलिसांनी यातील एक संस्थेचा ताब्यात घेतल्या असून दोन संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत. दि हिंद न्यूज सतीश रूपवते नाशिक
