घोटी सिन्नर महामार्गावरील शेनीत फाटा येथे बुधवार दि. २२ रोजी सकाळी जाहिर सभा.
n
n
- तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर धडाडणार संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांची तोफ.nघोटी सिन्नर महामार्गावरील शेनीत फाटा येथे बुधवार दि. २२ रोजी सकाळी जाहिर सभा.nसभेची पूर्वतयारी युद्ध पातळीवर सुरू.nशेनीत फाट्यावरील साखळी उपोषण स्थळी रोज बैठकांचा सपाटा.nलाखोंच्या उपस्थितीचा अंदाज.
n
n
n
- n
- काटेकोर नियोजनासाठी विविध समित्यांचेn
गठ्न
n
- हजारो स्वयंसेवकांची नियुक्ती.nआवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयोजक प्रयत्नशील.
n
n
nप्रमोद रहाणे l शेनीत, इगतपुरी.nसंघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची ईगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावरील शेनीत फाटा येथे येत्या बुधवार दिं. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा. जाहिर सभा आयोजीत करण्यात आली आहे. सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने इगतपुरी तालुका सकल मराठा समाज आयोजक म्हणून मुख्य भूमिका पार पाडत आहे.nसकल मराठा समाज इगतपुरी तालुक्याच्या वतीने या संदर्भात नुकतीच पत्रकार परिषद पार पडली.nत्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात येऊन सभेसंदर्भातील माहिती देण्यात आली. शेनित फाट्यावरील १०१ एकर भूखंडावर मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडणार आहे. सभेचे आयोजन नाशिक, सिन्नर, इगतपुरी, तालुक्यातील ६७ गावांच्या वतीने सरहद्दीवर करण्यात आलेले आहे. सभास्थळ तसेच वाहन तळाच्या जागेसाठी माळरानावर जेसीबी लावून जमीन सपाटी करणाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. जाहीर सभा यशस्वीपणे पार पडण्यासाठी सूक्ष्म नियोजन आयोजकांमार्फत केले जात आहे. त्यासाठी हजारो स्वयंसेवकाची स्वयंस्फूर्तीने नियुक्ती केली जात आहे. सभेच्या सूक्ष्म नियोजनासाठी विविध प्रकारच्या १५ समित्या गठीत केल्या जात आहेत. त्यामध्ये व्यासपीठ, वाहनतळ, पाणी पुरवठा, ट्रॅफिक नियोजन, आरोग्य सुविधा, रॅली नियोजन, भोजन व्यवस्था, समाज माध्यम प्रसिद्धी समिती, छायाचित्रकार समिती, स्वच्छता समिती, संपर्कप्रमुख समिती, जनसमुदाय नियोजन समिती, स्वागत समिती, अन्नपुरवठा नियोजन समिती, आर्थिक नियोजन समिती याप्रमाणे समित्या स्थापन केल्या जात आहेत. त्यासाठी आयोजकांनी सहभागाचे आवाहन मराठा समाज बांधवांना केले आहे. जाहीर सभेसाठी निधी संकलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. सभेला येणाऱ्या वाहनांसाठी तीन ठिकाणी वाहन तळांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इगतपुरी शहराकडून येणाऱ्या वाहनांसाठी साकुर फाट्यालगत कोठुळे पंपाजवळ ७० एकर रानावरती वाहनतळ असेल. भगूर मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी लहवीत गायरानावरती २५ एकर मध्ये वाहनतळ सोय करण्यात आली आहे. सिन्नर मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी कडवा पुलालगत ३५ एकर मध्ये वाहनतळ व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ठीकठिकाणी पिण्याचे पाणी,भोजन, स्वच्छतागृह व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने ५ हजार स्वयंसेवकांची नेमणूक या सभेसाठी केली जात आहे.nनाशिक हे अनेक क्रांतिकारी घटनांचे, आंदोलनांचे, संघर्षाचे, केंद्रबिंदू सातत्याने राहत आले आहे. त्या दृष्टिकोनातून जरांगे पाटलांच्या या जाहीर सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. सभेस मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. सभेविषयी पंचक्रोशीतील जनतेत उत्कंठा निर्माण झाली आहे. दि हिंद न्यूज प्रमोद राहणे भगूर नाशिक
