October 7, 2026

25 हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात

0

जापूर तालुका येवला येथील मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.n25 हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई.nnआलोसे मनोहर अनिल राठोड, मंडळ अधिकारी, राजापुर, ता. येवला जि.नाशिक यांनी २५ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.nयातील तक्रारदार हे शेतकरी असुन त्यांनी राजापुर येथे विकत घेतलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मौजे राजापुर तलाठी यांनी तक्रारदार यांची मालकी हक्काबाबत घेतलेली नोंद प्रमाणित करणेसाठी आलोसे मनोहर अनिल राठोड, मंडळ अधिकारी, राजापुर, ता. येवला जि. नाशिक यांनी तक्रारदार यांचेकडे २५ हजार रूपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली होती.nसदर तक्रारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला होता. सापळा कारवाई दरम्यान आलोसे मनोहर अनिल राठोड, मंडळ अधिकारी, राजापुर, ता. येवला जि. नाशिक यांनी तक्रारदार यांचे कडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम बुधवार दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.nसदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, नासिक परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *