October 8, 2026

देवळाली कॅन्टोन्मेंटच्या व्हेरिड बोर्डाला पाचव्यांदा मुदतवाढ, 

0

देवळाली कॅन्टोन्मेंटच्या व्हेरिड बोर्डाला पाचव्यांदा मुदतवाढ,nnनामनिर्देशित सदस्या आढाव यांना वाढीव कार्यकालाची पुन्हा संधी.nn nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- येत्या १० फेब्रुवारी रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या व्हेरिड बोर्डची मुदत संपुष्टात येत आहे. त्या अनुषंगाने संरक्षण मंत्रालयाने दिं. ३० जानेवारी २०२४ रोजी राजपत्र प्रसिद्ध करुन विद्यमान व्हेरिड बोर्डास १ वर्षाची मुदतवाढ जाहिर केली आहे.nnदेशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डांसह देवळालीतील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व्हेरिड बोर्डाचा अवधी दि.१० फेब्रुवारी २०२४ रोजी समाप्त होणार होता. तत्पूर्वीच संरक्षण मंत्रालयाने सद्या कार्यरत असणाऱ्या त्रिसदस्यीय समितीला बोर्डाची निवडणुक होई पर्यंत किंवा दिनांक १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.nnत्या संदर्भात विशेष राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्या प्रितम आढाव यांनाही वाढीव कार्यकाळासाठी कार्यरत राहण्याची संधी मिळाली आहे.nnकॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सध्या कार्यरत असलेल्या त्रिसदस्यीय समितीला कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा २००६ च्या अधिनियम १३ नुसार आगामी ६ महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात येते.nnकॅन्टोन्मेंट बोर्डच्या व्हेरिड बोर्डाला सलग पाच वेळा मुदतवाढ मिळण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. यापूर्वी पहिल्यांदा दि. ८ फेब्रुवारी २०२२, दुसऱ्यांदा दि. ११ ऑगस्ट २०२२, तिसऱ्यांदा दि. ७ फेब्रुवारी २०२३ चौथ्यादा दि. ३ ऑगस्ट २०२३ आणि आता पाचव्यांदा दि. ११ फेब्रुवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२५ अशी सलग पाचव्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सदस्या प्रितम दिनकर आढाव यांना सलग अडीच वर्ष सर्वाधिक काळ लोकनियुक्त सदस्य म्हणून पद भूषवण्याचा मान मिळाला आहे.nnबहुदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतरच २०२५ सालामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्ड नागरी क्षेत्र नाशिक महानगरपालिकेत विलीनीकरणाचा मुद्दा तांत्रिक अडचणीमुळे रेंगाळला आहे. त्यामुळे बोर्डाचे पुढे काय होणार ? याकडे जनतेचे लक्ष वेधले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *