देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन
देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन.n१० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई.nहिस्टरीशीटर आणि रेकॉर्ड वरील आरोपींची शोध मोहीम.nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प:- देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वतीने शहर आणि परिसरात शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री ७ ते ९ वाजे दरम्यान कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. २ अधिकारी आणि १५ पोलीस अंमलदारांनी मोहिमेत सहभाग नोंदवला. सदर मोहिमेत रेकॉर्डवरील आरोपी आणि हिस्टरीशीटर आरोपी यांची तपासणी करण्यात आली. कोंबींग ऑपरेशन दरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये १० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सदर मोहीम राबवली. देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील हाडोळा, सहा चाळ, जुनी स्टेशन वाडी, संसरी गाव येथील रेकॉर्ड वरील आरोपी तसेच हिस्टरीशीटर आरोपी यांचे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. रेकॉर्डवरील 14 आरोपींपैकी 8 जण सापडले. त्यांची चौकशी करून नोंद करण्यात आली. तर 6 जण सापडले नाहीत. 3 हिस्टरी सीटर आरोपींपैकी 2 जण सापडले. त्यांचीही सखोल चौकशी करून नोंद करण्यात आली. त्यापैकी 1 जण मिळून आला नाही. कोंबिंग ऑपरेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गांगुर्डे, पोलीस हवालदार राजेंद्र मोजाड, श्याम कोटमे, सुनील जगदाळे, पोलीस नाईक हिरामण बिडगर, संदीप नागरे ,सुनील चव्हाण, नितीन करवंदे, महिला पोलीस आमलदार सविता धांडे आदी सहभागी झाले होते. देवळालीतील कोंबिंग ऑपरेशन मुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतरही गावात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
