विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले
n
n
नासिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून प्रमुख पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसह विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले याच पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तीलोतमा सुनील जगताप यांनी नासिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला सध्या देशात आणि राज्यातील राजकीय स्थिती बघता या सरकार पेक्षा एक नवीन सशक्त पर्याय म्हणून देशभर आणि राज्यातही बहुजन मुक्ती पार्टीने आपले उमेदवार उभे केले आहेत वाढता भ्रष्टाचार ,महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि वंचित बहुजन समाजातील शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना पुन्हा शिक्षण मिळवून देण्यासाठी संसदेत बुलंद आवाज उठवण्यासाठी मी उमेदवारी करत असल्याचा आशावाद तिलोतमा सुनील जगताप यांनी यावेळी व्यक्त केला, यावेळी एडवोकेट सुजाता ताई चौदणे महिला आघाडी, नाशिक जिल्हा अध्यक्ष विलास तीगोटे, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष रवी सैंदाणे ,कल्पना इंगोले, किशोर पंडित ,सिद्धार्थ इंगोले ,गौतम साळवे ,शरद साळवे ,नितीन आढाव ,वसंत महाले, सत्यभामा वाळवंटे, प्रतिभा लोंढे ,सोनाली ढवळे ,राम ढवळे, अरुण कांबळे ,अविनाश पगारे आणि सुनील जगताप, आदी उपस्थित होते
n
n
n
n
n
