August 7, 2026

निर्यात बंदी हटविली; एकाच दिवसात ७५० रुपये क्विंटलने वधारले दर

0
लासलगावं  – केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्याचे वृत्त येताच   लासलगाव  बाजार समितीत कांद्याच्या दरात ७५० रुपयांचे भावात तेजी दिसून आली. शुक्रवारी उन्हाळ कांद्याला कमाल १८०१  रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता.

n

n

शनिवारी निर्यात बंदी हटताच कमाल २५५१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. कांद्याच्या कमाल दरात  सातशे  पन्नास रुपये वाढ  होऊन तेजीत विक्री झाल्याने  कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे

n

n

n

तब्बल पाच महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्याचे वृत्त येताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्पापूर्वी शेतकऱ्यांना गिफ्ट दिले आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. आता  कांदा निर्यातिचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य दर आकारले आहे.

n

n

याच बरोबर  कांद्याची निर्यात करताना 40 टक्के निर्यात शुल्क लावले जाणार  आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्याबंदी मुळे  नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज होते मात्र या निर्यात बंदी हटवल्याच्या निर्णयाने शेतकरी आणि व्यापारी सुखावला आहे. हे बदल 4 मे पासून लागू होणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

n

n

n

राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून लोकसभेच्या मतदानात कांदा निर्यातबंदीचा रोष व्यक्त होईल याची जाणीव झाल्यानेच सरकारने कांदा निर्यातबंदी हटवली आहे त्यातही साडेपाचशे रुपये प्रति टन किमान निर्यात मूल्य लागू केले आहे सरकारने कोणत्याही अटी शर्ती शिवाय कांद्याची निर्यात खुली करावी आणि मागील आठ नऊ महिन्यांत कांदा निर्यात बंदीच्या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची झालेले नुकसान भरपाई म्हणून सरकारने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोन हजार रुपये दरातील तफावत भरपाई द्यावी.

n

n

भारत दिघोळे 

n

अध्यक्ष -महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

n

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *