August 9, 2026

दारू नव्हे औषध बेतले जीवावर उलट्या होऊन एकाचा मृत्यू

0

इगतपुरी : दारूचे व्यसन जडल्याने त्याला कुटुंबियांनी दारू सोडविण्यासाठी इगतपुरीत आणले. दारू नाही पण, दारू सोडविण्याचे औषध घेतल्यानंतर त्याला उलट्या झाला आणि हेच औषध त्याच्या जीवावर बेतले. संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील रवीद्र गोविंद बोर्डे, असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे.n50 वर्षीय बोर्डे यांना दारूचे व्यसन जडले होते. नेहमीचेच झालेले दारूण सेवन त्यांच्या संसारात विष कालवणारे ठरले. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांची दारू सोडविण्याचा निर्णय घेतला आणि थेट इगतपुरी गाठले. दि.24 एप्रिलला नांदूर वैद्य येथील एका बाबाकडे नातेवाईकासह दारू सोडविण्याचे औषध घेण्यासाठी आले. औषध घेतल्यानंतर बोर्डे यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे बरोबर असलेल्या नातेवाईकांनी 25 एप्रिलला त्यांना तात्काळ उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी शिंदे यांनी त्यांची तपासणी केली असता त्यात संबंधित इसम मयत झाल्याचे आढळले. डॉ. शिंदे यांनी बोर्डे यांना मयत घोषित केले. या प्रकरणी वाडीव-हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला असून पुढील अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील तपास करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, दारू जीवावर बेतू नये म्हणून कुटुंबियांनी दारूपासून बोर्डे यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. पण, दारू नव्हे तर दारू सोडविण्याचे औषधच त्यांच्या जीवावर बेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *