आ.नरहरी झिरवाळ शरद पवार गटात परतले?
नाशिकnलोकसभेच्या निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस चढत असतानाच धक्कादायक राजकीय घडामोडीही घडत आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जय महाराष्ट्र करून शरद पवार यांच्याकडे परतल्याची जोरदार चर्चा शुक्रवारी रंगली.nराष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ , आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे हेही गेले. शरद पवार यांना सोडून जाणार्यांमध्ये राजकारणातील साधे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार नरहरी झिरवाळ हेही होते. आदिवासीबहुल दिंडोरी-पेठ तालुक्यातून निवडून आलेले झिरवाळ केवळ आमदार नाही तर विधानसभेचे उपसभापती आहेत. एका साध्या व्यक्तिमत्वाला थेट विधान सभेच्या उपसभापती पदापर्यंत पोहचवूनही झिरवाळ यांनी शरद पवार यांची साथ सोडल्याने राजकीय क्षेत्रातूनच नाही तर सामान्य जनतेतूही संतापाची लाट उसळली होती. याच झिरवाळ यांनी अजित पवार यांना जय महाराष्ट्र करून ते पुन्हा शरद पवार गटात परतल्याची जोरदार चर्चा शुक्रवारी रंगली.nशरद पवार गटाचे श्रीराम शेटे तसेच महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर भगरे आणि आणखी एका पदाधिकार्यासोबत झिरवाळ व्यासपीठावर बसलेले असल्याचे छायाचित्र माध्यमातून झळकले आणि सार्यांच्याच भुवया उंचावल्या. त्याआधी झिरवाळ यांचे पुत्र गोकूळ यांनी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी शरद पवार गटाच्या पदाधिकार्यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत त्यांनी इन्कार केला होता. आता दस्तुरखुद्द झिरवाळच व्यासपीठावर शरद पवार गटाच्या पदाधिकार्यांसोबत दिसत असल्याने ते परतल्याच्या चर्चेला एकप्रकारे पुष्ठीच मिळत आहेत. याबाबत शरद पवार गटाच्या पदाधिकार्यांनी दुजोरा देत अजून बरेच जण परतणार असल्याचे दै. नाशिक लोकलशी बोलताना सांगितले.nकोटnतुम्हीच आम्हाला सांगायला पाहिजे. झिरवाळ परत आले. ते आपल्याला मदत करीत आहेत. अजून बरेचजण पक्षात येणार आहेत.nकोंडाजी मामा आव्हाड, नेते शरद पवार गटnचौकटnबदलते राजकीय वारे?nदिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांद्याच्या निर्यातबंदीवरून महायुतीविरोधात प्रचंड नाराजी आहे. सुरूवातीला निवडणूक लढविण्यावर ठाम असलेले माकपचे जिवा पांडू गावित यांनी अखेरच्या क्षणी माघार घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. बहुधा बदलते राजकीय वारे बघून झिरवाळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतल्याचा अंदाज बांधला जात आहे. कारण, लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार असून तसा विचार झिरवाळ यांनी केला असावा, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
