August 8, 2026

सावकाराच्या घरात आढळले धनादेश, करारनामे, साठेखत

0

नाशिकnपरवाना नसताना बेकायदा सावकारी करून अव्वाच्या सव्वा व्याजाने वसुली तसेच मालमत्ता हडपणार्‍या सावकाराविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात फोफावलेल्या अवैध सावकारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.nछाप्यात लाखोंच्या बेकायदा व्यवहाराचे धनादेश, संबंधित कागदपत्रे ,खरेदी खते पथकाच्या हाती लागले आहेत.nविंचूर गवळी येथे राहणारा विठ्ठल कचरू रिकामे , असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. सावकारी व्यवसाय करण्यासाठी परवाना आवश्यक आहे. परवाना मिळाल्यानंतरही नेमके किती व्याज आकारणी करावी, याचे मापदंड ठरवून दिले जातात. रिकामे याच्याकडे परवाना नसतानाही तो बिनधास्तपणे सावकारी करीत असल्याचे प्रकरण एका महिलेले उजेडात आणले. यासंदर्भात संबंधित महिलेने उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर 3 नोव्हेंबर 2023 ला पथकाने रिकामे याच्या घरी धाड टाकली. या छाप्यात रिकामे याने केलेल्या व्यवहारासंदर्भात अनेक कागदपत्रे पथकाच्या हाती लागली. त्यानंतर पथकाने तक्रारदार महिला आणि रिकामे याचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर रिकामे हा अवैध सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरोधात मुख्य लिपीक मंगेश वैष्णव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.nचौकटnधाडीत हे सापडलेnपथकाने संशयिताचे घर गाठून छापा टाकला असता त्याच्या घरात तक्रारदार महिलेच्या वाहनाची कागदपत्र आढळली. तसेच स्टेट बँकेच्या सिडको शाखेचा रिकामे याच्या नावे असलेला 2 लाख 10 रूपये आणि 65 हजार रूपयांचा धनादेश पथकाच्या हाती लागला. 1 लाख 50 हजार रकमेची हात उसनवार पावतीही पथकाला मिळाली. याशिवाय अनेक लोकांच्या विसार पावत्या व खरेदी खत, साठेखत, करारनामे, विक्री करारनामा, भरणा पावती,जनरल मुख्त्यारपत्र,साठेखत करारनामा उसनवार पावत्या अशी महत्वाची कागदपत्रे पथकाला मिळाली.nचौकटnदोन महिन्यांपूर्वी अवैधरित्या सावकारी करणार्‍या दोघा सावकारांविरोधात अशाच पध्दतीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर उपनिबंधक कार्यालयाने त्यांच्या घरी धाड टाकली होती. त्यात करारनामे, स्टॅम्पपेपर, धनादेश, व्याजाने पैसे दिलेल्या लोकांच्या नोंदी असलेल्या वह्या आदी कागदपत्रे आढळली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *