एडवोकेट प्रकाश आंबेडकर उद्या नाशिक दौऱ्यावर.
- n
- वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो एडवोकेट प्रकाश आंबेडकर उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. गेल्या लोकसभेत प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रात एकही जागा जिंकली नाही. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात स्वबळावर लढली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व इतर घटक पक्षांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांसोबत युती न करता महाविकास आघाडी मार्फत जनतेकडे मतदान मागितले. बहुतांश व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागांना प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी सोबत नाही म्हणून मोठा फटका बसला. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचा निवडणुकीत कोणतेही प्रकारचा सहभाग नव्हता याचा फायदा तोटा काय झाला असेल हे आपण निवडणुकीत पाहिलंच. मात्र लोकसभा निवडणुकीत राजकीय गणित बदललीत हे निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा नाशिक मधील मराठा पॅटर्न चालला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला नाशिक मध्ये अल्प मिळाली.वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो एडवोकेट प्रकाश आंबेडकर सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आंबेडकरांसोबत कोणी येऊ नये स्वबळावर विधानसभा निवडणूक लढतील असं त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. एडवोकेट प्रकाश आंबेडकर उद्या नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलणार आहेत. नेमका काय नवीन विषय एडवोकेट प्रकाश आंबेडकर नाशिक मध्ये घेऊन येतात हे पाहणे गरजेचे आहे. वंचित बहुजन आघाडी नाशिक मधील चार आमदारकीचे जागा आता कशा पद्धतीने लढवणार आहे हे पाहणे गरजेचे आहे.
n
