नाशिक जिल्हा, गुंडगिरीचा बालेकिल्ला कायदा व सुव्यवस्था नाशिकला चिंतेचा विषय झाला आहे नाशिकची गुंडगिरी थांबता थांबत नाहो . दररोज खून – मुडदे पडत आहे नाशिकचे पोलीस आयुक्त शर्थिचे प्रयत्न करीत आहे, नाना तर्हेने गुंडाणा पायबंद घालण्याचा प्रयत्न सुरु आहे परंतु खून, खंडणी, दहशत, चोरी, दरोडे काही थांबत नाही गुंडाची धिंड काढली जात आहे पण त्याचाही फारसा परिणाम दिसत नाही धिंड गुंडाला आणि लोकांना सवयीची झाली आहे
दोरखंडाने बांधलेले, लंगडत – लंगडत चालणारा गुंड कानाला पकडून माफी मागतोय – भाईगिरी करणार नाही अश्या याचना करतोय परंतु लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही हाच धिंड काढला गेलेला गुंड पुन्हा गुंडागिरी करताना दिसणार आहे
ज्यांची धिंड काढल्या गेली ती सर्व नवीन भरती झालेले गुंड आहे एकाही नामचिन, ज्याचा धाक आहे ज्याच्या हाताखाली पाच पन्नास गुंड काम करीत आहे अश्या वजनदार गुंडाची धिंड काढल्या गेली नाही पोलिसांचा पक्षपात लोकांच्या नजरेत येत आहे
कामाची आणि काजाची नसलेली धिंड बघता गुंड- गुन्हेगारा पेक्षा पोलीस जास्त हतबल झाल्याचे दिसत आहे
भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोडं इतके मजबूत- ताकदवार असताना धिंड हा प्रकार बिनकामाचा, पोरकट वाटतो IPC ची इमाने इतबारे अंमलबजावणी केल्यास गुंड गुन्हेगार सुता सारखे सरळ होतील परंतु राजकीय दबाव आणि पैसा याच्यापुढे पोलीसअधिकारी शरण जातात, विकल्या गेले जातात अश्या वेळी गुन्हेगारांना मदत होईल असा तपास, पंचनामे, जाबजबाब, साक्षी पुरावे तय्यार केले जातात
पोलीस मॅनेज झाल्या नंतर सरकारी वकील मॅनेज करावा लागतो आणि शेवटी न्याय देणाऱ्या न्यायमूर्तीला देखिल विकत घ्यावे लागते.. . गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीला अटक पूर्व जामीन मिळविणे हल्ली फॅशन मोठेपणाचे लक्षण मानले जाते खुणाच्या गुन्ह्यातआरोपी निर्दोष सुटल्यास तपास अधिकाऱ्याची वेतन वाढ गोठविली पाहिजे त्याच्या सर्व्हिस बुकात नोंद घेतली पाहिजे जेणे करून त्याचे प्रोमोषन रोखले गेल्यास निदान खुणाच्या गुन्ह्यात शिक्षा वाढतील, फरारी गुन्हेगारास अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास असे समजून चला यात पोलीस तपास अधिकारी विकल्या गेलेला आहे आरोपी पोलिसांच्या संमती आणि सहकार्याशिवाय फरारी होऊच शकत नाही .नाशिक सेंट्रल जेल गुन्हेगार तयार करणारा कारखाना झाला आहे माजिस्ट्रेट कस्टडी मिळाल्या नंतर आरोपीची रवानगी सेंट्रल जेल मध्ये होते महिना- दीड महिना तुरुंगातल्या मुक्कामात नवीन रिकृट गुन्हेगार बऱ्या पैकी ट्रेनिंग घेऊनच बाहेर पडतो तुरुंगातल्या कैदेत असलेल्या कैद्यांची बाहेर अर्धवट कामे पूर्ण करण्याची सुपारी घेऊन बाहेर पडतो अश्या वेळी त्याला मदत करणारे सहकारी त्यांचे राजकारणतले गॉड फादरचे नाव पत्ते नंबर मिळालेले असतात मगतो सराईत गुन्हेगारा प्रमाणे वाटचाल सुरु करतो
खटला रेंगाळत ठेवणे हा एक हात खडा वापरला जातो एपिलात जाऊन अपील पेंडिंग ठेवणे कोर्टात वर्ष न वर्ष खटले, अपील पेंडिंग असतात. गुंडगिरी- गुंडाराज संपविण्याची जबाबदारी पोलीस आणि कोर्टावर सोपवून चालणार नाही तर आम जनतेची, विशेक्षत. राजकारणी लोकांची फार मोठी जबाबदारी आहे. राज्यकर्ते, राजकारणी लोकांच्या सहकार्य मिळाल्या शिवाय गुंडागिरी करूच शकत नाही गुंडाणा राजकारणी लोकांची मदत आवश्यक असते त्याचं प्रमाणे राजकारणी लोकांना गुंडाची मदत आवश्यक असते असे हे साठेलोटे आहे
नाशिक जिल्हाच्या विचार करता साधारण पने छगन भुजबळ यांचा नाशिकच्या राजकारणात प्रवेश झाल्यापासून राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांचे राजकारण सुरु झाले नाशकाच्या राजकारणात जम बसल्या नंतर स्थिर सावर झाल्या नंतर भुजबळांनी ऐक एक शिलेदारा पासून अंतर वाढवीत गेले एकेकाळचे भुजबळांचे शिलेदार आज आप आपल्या पद्धतीने आपापल्या सोयीने स्थिर सावर झाले आहे .त्या काळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती मध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. सामाजिक, साहित्यिक, संसुकृतिक, परिवर्तनाचा बालेकिल्ला असलेला नाशिक झिल्हा गुंडगिरीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो . सावरकर, कुसुमाग्रज, दादासाहेब गायकवाड यांचे नाशिक आज गुंडाचे नाशिक संबोधले जातेय. गुंड आणि राजकारणी यांचे नाते यांची नाळ तोडली पाहिजे . दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुका पार पडणार आहे सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यात यावे गुंडगिरीची प्रश्वभूमी असलेला किंवा कुटुंबातला गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात येऊ नये
आजच्या घडीला नाशकात एक काँग्रेस, एक भाजपा, दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अश्या प्रकारे सहा मुख्य राजकीय पक्ष आहेत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून नाशिकचा महापौर भाजपचा होईल असा अंदाज आहे भाजपाच्या हातात नाशिकची सत्ता देण्याचा नाशिककर मतदारांचा निर्णय आहे त्या मुळे भाजपात इन्कमिंग मोठ्या प्रमाणात सुरु आहे साहजिकच गुंड – गुन्हेगार देखिल भाजपा कडे उमेदवारी मिळविण्यास रांगेत आहेत
एकेकाळी भाजपा पक्षाला उमेदवार मिळत नव्हता आज मोदी- शहा यांच्या मुळे भाजपाला सुगीचे दिवस आले आहे गुंडाणा उमेदवारी देऊन पायावर धोंडा मारून घेऊ नका भाजपा खालों खाल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गुंड- गुन्हेगारांची उमेदवारी साठी गर्दी आहे शिंदे शिवसेनेने डोळ्यात तेल घालून काळजी घेतली पाहिजे चुकून- मुकून गुंड, गुन्हेगाराला उमेदवारी मिळता कामा नये ललित पाटील प्रकरणी हात पोळले आहे आता ताकदेखील फुकून प्याले पाहिजे
… उबाठा सेनेची पडझड, स्थानिक सक्षम नेतृत्वाचा अभाव संजय राऊंतांची एकधिकार शाही मुळे गुंड गुन्हेगार तिकडे फिरकतील असे वाटत नाही .नाशिक मध्ये काँग्रेस पक्ष अस्तित्व हीन झाला आहे निवडणुकीची, उमेदवारीची हौस भागवणारे तिकडे वळतील .एकंदरीत भाजपा आणि शिंदेसेना हया दोन पक्षात व त्यांच्या मित्र पक्षात गुंड- गुन्हेगार घुसणार नाही याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्या कडे असेल संकट मोचक अशी त्यांची ख्याती आहे .गुंडाराज हया संकटाचे उच्चाटण गिरीश महाजन निश्चित करतील असा विश्वास वाटतो
गुंडगिरी, खून, मारामाऱ्या, खंडणी, सोनसाखळी चोर, दशहत, दोनचाकी, चारचाकी वाहनाना आगी लावणे, गुंडगिरी- गुंडा राज मुक्त नाशिक निर्माण करण्यासाठी गुंड उमेदवार आपला भाऊ, नातेवाईक, सगा- सोयरा, जातवाला, गाववाला, मित्र- यार असेल जरतो गुंडगिरीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असेलअश्या गुंड उमेदवाराला मत देऊ नका गुंडगिरीमुक्त नाशिक, ड्रग मुक्त नाशिक हेच आपले उद्दिष्ठ.
तानसेन ननावरे युनायटेड रिपब्लिकन पार्टी 99877489015