सतिश रूपवते : संपादक : नाशिक लोकल
नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणात आरपीआयचे आठवले गटाचे प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना अटक करण्यात आले आहे. भूषण लोंढे याने बारमध्ये गोळीबार केला होता.
नाशिक : गोळीबार आणि खंडणी प्रकरणांमध्ये आरोपी करण्यात आलेल्या आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्यांचा पुत्र दीपक लोंढे यांना आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसी खाक्या दाखवून माजलेल्या आरोपींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेण्यात आले. प्रकाश लोंढे आणि त्यांचा पुत्र दीपक लोंढे याला १२ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना अडवून लुटमार केली जाते, कुणाला धमकावले जाते. दुकानदारांकडून हफ्ते मागितले जातात. नकार दिला तर त्यांना मारहाण केली जाते. एकंदरित या परिसरात लोंढे गँगची दहशत मोठी आहे. राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून आम्हाला कुणीच हात लावू शकत नाही, असे लोंढे गँगमधील सदस्य अप्रत्यक्षपणे वागण्यातून सांगत होते. त्याच आरोपींचा माज आज नाशिक पोलिसांनी मोडला. प्रकाश लोंढे यांचा एक पुत्र भूषण लोंढे अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे, मात्र या प्रकरणात राजकीय गुन्हेगारांनी अशाप्रकारे घोषणा दिल्याने कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही हा संदेश पोलिसांनी दिला आहे. नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींना नाशिक कोर्टात हजर केले. गोळीबार प्रकरणातील प्रकाश लोंढे आणि तिघांना १२ ऑक्टोबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे असे म्हणायला पोलिसांनी आरोपींना भाग पाडले.