Homeताज्या बातम्याविनापरवाना खते व बियाणे विक्री, अभोणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल*

विनापरवाना खते व बियाणे विक्री, अभोणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल*

विनापरवाना खते व बियाणे विक्री, अभोणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल

मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कार्यालय नाशिक येथे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने  दिनांक 12/11/2025 रोजी जिल्हा भरारी पथक चे सदस्य डॉ. जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवता नियत्रंण निरीक्षक, नाशिक , श्री. कल्याण पाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, विभागीय कृषी सह संचालक कार्यालय नाशिक विभाग, नाशिक व श्री. विठ्ठल रंधे कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कळवण यांना मिळालेल्या माहीतीनुसार अवैध विनापरवाना खते व बियाणे ऑनलाईन घरपोच  जिल्ह्यात विक्री होत असले बाबत  कनाशी येथील अधिकृत निविष्ठा विक्रेते यांनी Agrozone प्रा ली, या कंपनीचा टाटा ECE नावाची (छोटा हत्ती) थांबवून ठेवला. त्यानुसार  कनाशी येथील कृषी निविष्ठा विक्रेते यांनी भ्रमणध्वनी द्वारे  श्री रंधे यांना कळविले  श्री रंधे यांनी जिल्हा भरारी पथक यांना कळविले.  सदर माला बाबत  वाहन चालक श्री दीपक जाधव यांना बिले व परवान्याची मागणी केली असता  यांनी बिल  सादर केली परंतु  विक्री परवाना सादर केले नाही. म्हणून सदर मालाबद्दल संशय बळावल्याने अभोणा पोलीस ठाणे येथे घेऊन मालाची पंचासमक्ष शहानिशा केली.   खते व बियाणे  चे एकूण 7 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 02 बियाणे नमुने बियाणे कायदा 1966 व बियाणे नियम 1968 मधील विहीत पदधतीने काढुन बिज परीक्षण प्रयोगशाळा पुणे येथे व 05 रासायनिक खताचे नमुने खतनियंत्रण आदेश 1985 मधील विहीत पदधतीने काढुन खतनियंत्रण प्रयोगशाळा,‍ नाशीक येथे तपासणी कामी पाठवण्यात आले. ‍

शेतकरी बंधुनाविक्री हेतु उत्पादन, वाहतुक व साठा agrozone कंपनीचे संचालक मंडळ यानी बियाणे कायदा 196‍6, बियाणे नियम 1968, बियाणे निंयत्रण आदेश 1983 , खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तु अधीनीयम 1955 मधील तरतुदीचा भंग केला आहे. सदर साठा पोलीस स्टेशन येथे जप्ती पंचनामा करून जमा करण्यात आला. संशयित आरोपी  आहे. तरी agrozone प्रा. लि. कंपनीचे संचालक मंडळ व श्री. संदिप सुभाष भामरे रा. नाशिक ( स्टेट हेड) व वाहनचालक श्री दिपक सुर्यभान जाधव रा. कसबे सुकेणे ता.निफाड नाशीक यांनी संगणमताने महाराष्ट्र राज्यात खते व बियाणे विक्री व साठवणूकीचा, वाहतुकीचा परवाना नसतांना शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली आहे. म्हणून वाहनचालक- श्री दिपक सुर्यभान जाधव रा. कसबे सुकेणे ता.निफाड नाशीक व agrozone प्रा. लि. कंपनीचे संचालक मंडळ यांचे विरोधात बियाणे कायदा 1966, व बियाणे अधीनीयम 1968, खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 आणि भारतीय न्याय संहीता 2023 चा भंग केल्याने बियाणे कायदा 19665) तरतुदींचे उल्लंघन  केले म्हणुन. अभोणा पोलीस ठाणे ता. कळवण येथे श्री. विठ्ठल रंधे, कृषी अधिकारी गुण नियंत्रण, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळवण यांनी गुन्हा दाखल केला आहे. पंच म्हणून श्री.कैलास पाटील, मंडळ अधिकारी कळवण व  श्री. राजू खांडवी, सहायक कृषी अधिकारी, कनाशी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयकळवण यांनी पंच म्हणून काम केलं.

मा. श्री सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक, मा. श्री रविंद माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक व मा. श्री संजय शेवाळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शना खाली कारवाही करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाना  आवाहन करण्यात येते की सर्वांनी अधिकृत विक्रेते यांच्याकडून कडून पक्के बिल घेऊन खते बियाणे खरेदी करावे असे आवाहन मा श्री. रवींद्र माने जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नाशिक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!