ओझर विमानतळाला रामायण कालीन जटांयू नाव देण्याची मागणी साधू संतांनी केल्यामुळे रिपब्लिकन आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड संताप आणि उद्रेक निर्माण झालेला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात रिडल्स आंदोलनाच्या धर्तीवर हिंदुत्ववादी विरोधी आंबेडकरवादी असा संघर्ष उभा राहण्याची भीती व्यक्त करीत असताना ज्येष्ठ रिपब्लिकन नेते तानसेन ननावरे, चिंतामण गांगुर्डे व अरुण केदारे यांनी पुढाकार घेऊन नाशिकमध्ये कार्यरत नाशिक विमानतळ नामकरण समिती व नाशिक विमानतळ नामांतर कृती समिती या दोन्ही समित्यांना एकत्र आणण्याचा भाग म्हणून आज दिनांक 14 डिसेंबर शासकीय विश्रामगृह गोल्फ मैदान नाशिक दोन्ही समितीची बैठक संपन्न झाली.
या दोन्हीही समित्याने एकत्र येऊन नाशिक विमानतळ नामांतराचा लढा लढवण्याचा निर्धार केला, यामुळे सर्व कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे विमानतळ नामांतराचा प्रश्न लवकरच निकाल निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जटांयूची विमानतळाला नाव देण्याची साधू संतांची मागणी खोडसाळ समाजातही दुही निर्माण करण्याची आहे. शिंदे – फडणवीस सरकारने याची गंभीर दखल घेऊन सदर नामांतराचा ठराव मंत्रिमंडळात तथा विधानसभेत संमत करण्याचे आव्हान करण्यात येत आहे. गोवा विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव देऊन परीकर यांचा सन्मान करण्यात आला, त्याच धर्तीवर संयुक्त महाराष्ट्र समितीचे सेनापती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उजव हाथ कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचाही सन्मान करण्यात यावा, अशी मागणीचा ठराव आज संयुक्त बैठकीत संमत करण्यात आला.
. सदर बैठकीला अण्णासाहेब कटारे, तानसेन ननावरे बाळासाहेब शिंदे ,आदेश पगारे , मदन शिंदे, पवन पवार, अविनाश शिंदे, राजेंद्र गायकवाड ,दीपक ननावरे, लक्ष्मी ताटे,अर्जुन उघडे, दिनेश पगारे भीवानंद काळे ,शाम वाडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रिपब्लिकन आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड संताप
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!