तीस दिवसात 12 ट्रॅप यशस्वी करणाऱ्या शर्मिष्ठा वालावलकर या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक आहेत. 23 नोव्हेंबर 2022 रोजी शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागा नाशिक येथील चार्ज स्वीकारला आणि धडक कारवाईला सुरुवात झाली.शर्मिष्ठा वालावलकर यांना पदभार स्वीकारून फक्त 30 दिवस झाले आहेत मात्र 30 दिवसाच्या कामगिरीत त्यांनी तब्बल 12 यशस्वी कारवाया केल्यात. कारवाईला सुरुवात झाली ती महावितरण कंपनीपासून महावितरण कंपनीत दोन, एम एस डी सी एल मध्ये एक,नगर मध्ये दोन,धुळ्यात एक, नाशिक मध्ये दोन, घोटीत एक, नगर जीएसटी विभाग जळगाव सहायक सहकार अधिकारी, पीडब्ल्यूडी कोषाधिकारी चांदवड, नाशिक महानगरपालिका जीएसटी विभाग ग नायब तहसीलदार, आणि आता सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी अशा 30 दिवसात तब्बल 12 कारवाया करण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला यश मिळाले आहे. एक महिन्यात डझन दर कारवाया झाल्यामुळे नाशिक विभाग भ्रष्टाचाराच माहेरघर झाले की काय असं आता नाशिककरांना वाटू लागला आहे. संशयित आरोपी मधुकर दत्तू पालवी, वय ४२ वर्ष, पोलीस नाईक, याची नेमणूक सरकारवाडा पोलीस ठाणे, नाशिक शहर, रा.पोलीस वसाहत, पोलीस मुख्यालयाजवळ, नाशिक शहर याने दिनांक – २०/१२/२०२२ रोजी ५०० रूपये लाचेची मागणी केली होती दिनांक – २२/१२/२०२२ रोजी ५००/- लाच मधुकर दत्तू पालवी याने स्वीकारली हस्तगत रक्कम- ५००/- रुपये.लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांच्या चारचाकी वाहनाचे प्रादेशिक परिवहन विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र ( R.C.) गहाळ झाले होते. सदरील नोंदणी प्रमाणपत्र गहाळ झाले बाबत वस्तू गहाळ नोंदवही मध्ये नोंद करून सदरबाबत दाखला देण्याचे मोबदल्यात लाचेची मागणी करून ती स्वीकारली म्हणून गुन्हा करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संदीप घुगे, एकनाथ बाविस्कर प्रकाश महाजन यांनी केली आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तसेच सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक @ दुरध्वनी क्रं. ०२५३- २५७८२३० Toll free number – १०६४ E mail- spacbnashik@gmail.com असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.