Homeअपघातअपघात स्थळापासून चार किलोमीटर अंतरावर आढळला कार चालकाचा नग्न अवस्थेतील फासावर लटकलेला...

अपघात स्थळापासून चार किलोमीटर अंतरावर आढळला कार चालकाचा नग्न अवस्थेतील फासावर लटकलेला मृतदेह

अपघात स्थळापासून चार किलोमीटर अंतरावर आढळला कार चालकाचा नग्न अवस्थेतील फासावर लटकलेला मृतदेह

नाशिकः जिल्ह्यातील सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवडजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका कारचा अपघात झाल्याची विचित्र घटना घडली आहे. अपघात स्थळापासून कार्य चालकाचा मृतदेह सुमारे चार किलोमीटर अंतरावर नग्न अवस्थेत एका रसवंतीच्या शेडमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

आकाश मोहन खताळे (वय २४) रा. अंबड चिंचाळे असे मृत कारचालकाचे नाव आहे. घोरवड गावाजवळ रात्रीच्या सुमारास एक कार पुलाच्या कठड्याला धडकून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील विहिरीजवळ येऊन पडली. या घटनेची माहिती आज खूप काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कार जवळ पाहणी केली परंतु त्या ठिकाणी कुठलीही व्यक्ती आढळून आली नाही.

दरम्यान, कारचालकाचा शर्ट घटनास्थळाजवळील डोंगराच्या पायथ्याशी सापडला पण चालकाचा मृतदेह तेथून चार किमी अंतरावर असलेल्या हॉटेल जयभवानी येथे रसवंतीच्या पत्रटी शेडच्या अँगलला फासावर नग्न अवस्थेत लटकलेला आढळून आला.मयत आकाश खताळे हा पांढुर्ली येथे आपल्या नातेवाईकांकडे आला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी खाली उतरवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठवला त्यांनतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेनंतर हा खरंच अपघात आहे की अपघाताचा बनाव करत आत्महत्या केली आहे किंवा अन्य काही घातपात आहे असा संशय व्यक्त केला जात असून परिसरात या घटनेच्या चर्चेला उधाण आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!