सिडको : शहर
सिडको परिसरातील दत्त चौक भागात अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात जोरजोराने शिवीगाळ करत दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन,पोलिसांनी त्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे आहे.
सविस्तर असे की सिडकोतील दत्तचौक परिसरातील स्वामी समर्थ केंद्र जवळ रविवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात चार ते पाच टवाळखोरांनी परिसरातून पायी चालत जोरजोरात शिवीगाळ केली.यातील एक ते दोन टवाळखोरांच्या हातात धारदार कोयते होते.टवाळखोर हे फोनवर कोणाशी तरी संपर्क साधत जोरदार शिवीगाळ करीत भर रस्त्यात कोयते आपटत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दर सात ते आठ दिवसांनी सदर टवाळखोर दत्त चौक भागात दहशत माजवत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहे. याबाबत अंबड पोलिस अधिक तपास करत आहे…