दुचाकी व घरफोडी करणारे दोघां चोरटयांना अटक
नाशिक : आडगाव
आडगाव पोलिसांना शिलापुर गांव येथे पेट्रोलींग दरम्यान एक यामाहा कंपनीची काळा ग्रे रंगाची दुचाकी स व एक काळया रंगाची बजाज कंपनीची पल्सर २२० सि.सी. याच्या मागे पुढे नंबर प्लेट नसल्याने संशयास्पद स्थितीत रस्त्याने जात असतांना मिळून आल्याने दिसुन आल्या गुन्हे शोध पथकाचे अमलदार यांनी दुचाकी चालकांना थांबण्यास सांगितले असता . ते तेथून पळून जाण्याचा प्रयत्नात असताना उपनिरीक्षक बी. एस. वाढवणे, पोलीस कॉन्सटेबल दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, अमोल देशमुख यांनी दुचाकीचा पाठलाग केला असता. शिलापुर शिवार नाशिक येथे ताब्यात घेतले असता. संशयिता श्रावण पोपट भालेराव (वय २३ वर्षे, रा. मच्छिंद्रनाथ मंदिर मागे संत जर्नादन स्वामीनगर नांदुरनाका नाशिक) व दुसरा संशयित सोनु उर्फ अनिल माणिक शिंदे (वय २१ वर्षे, रा. आढाव पेट्रोल पंप मागे जेलरोड नाशिकरोड) अशी नावे असुन विचारपुस व कसोशीने चौकशी केली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये एक यामाहा कंपनीची काळा ग्रे रंगाची R- १५ मो.सा व एक काळया रंगाची पल्सर दुचाकी तसेच सोन्याचे दागिने असे मिळुन आले . संशयितांनी उपनगर व कसारा या परिसरातुन दुचाकी चोरी केली. तसेच जानोरी गांव ता.दिडोरी येथून घरफोडी केल्याची कबुली दिली . दिडोंरी पोलीस स्टेशन व उपनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले ०२ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. संशयितांना कारवाई कामी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि / हेमंत तोडकर, सपोउनि / भास्कर वाढवणे, पोहवा / सुरेश नरवडे, पो. अं/ दिनेश गुंबाडे, पो. अं. / निखिल वाघचौरे, पो. अं. / अमोल देशमुख आदि च्या पथकाने केली .
दुचाकी व घरफोडी करणारे दोघां चोरटयांना अटक
Recent Comments
on Hello world!