HomeCrimeपाच महिन्यापासून फरार असलेल्या दोघा संशयितांना अटक गुन्हे शाखा युनिट १...

पाच महिन्यापासून फरार असलेल्या दोघा संशयितांना अटक गुन्हे शाखा युनिट १ ची कमगिरी

 

पाच महिन्यापासून फरार असलेल्या दोघा संशयितांना अटक

गुन्हे शाखा युनिट १ ची कमगिरी
नासिक : शहर
१५ नोव्हेंबर २०२२ रोजी ज्येष्ठ नागरिकास ६६ लाख ५० हजार रुपये बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. होलाराम कॉलनी, आंबेडकर चौक येथील ज्येष्ठ नागरिक कन्हैयालाल तेजसदास मनवानी यांचा कारचालक देविदास मोहन शिंदे यानी व कारमध्ये बसलेला त्याचा साथीदार यांनी आपसात संगनमत करून कन्हैयालाल मनवाणी यांचे छातीला रिवाल्वर लावून त्यांचे जवळील ६६ लाख ५० हजार रुपये रोख असलेली कापडी पिशवी व मारुती कार क्रमांक एम एच १५ जीएफ ९५६७ बळजबरीने चोरी करून पळून गेले होते. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हे शाखा युनिट १ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रवीण म्हसदे, संदीप भांड, नाझिमखान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, मुक्तार शेख आधीच्या पथकाने संशयित आरोपी युवराज मोहन शिंदे (३७), देविदास मोहन शिंदे (२६) यांचा कोल्हापूर, पुणे, कात्रज येथे शोध घेत असताना. संशयित हे नाशिक मध्ये सातपूर परिसरात आल्याची पोलिस अंमलदार प्रवीण वाघमारे यांना गुप्त मिळाली होती. पथकाने सातपूर परिसरातुन चारचाकी फोक्सवॅगन कारसह ताब्यात घेतले. संशयितांची सखोल चौकशी केली असता. सदरचा गुन्हा संगनमताने केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या रोख रक्कमे पैकी ५३ लाख रुपये रोख तसेच चोरीच्या रक्कमेतून विकत घेतलेली वोक्सवॅगन कार व तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल, एक ट्रॅव्हलिंग बॅग असा एकूण ५७ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास व कारवाईकामी संशयितांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरचा सदरचा गुन्हा उघडी सांगणाऱ्या पथकाला पंधरा हजार रुपयांचे बक्षीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव यांनी जाहीर केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!