Homeशेतीनानेगावला दूध उत्पादक शेतकऱ्यांना मका बियाणे वाट

नानेगावला दूध उत्पादक शेतकऱ्यांना मका बियाणे वाट

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प: नानेगाव येथे कृषी विभागातर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या दुभत्या जनावरांना घरच्याघरी चारा उपलब्ध होण्यासाठी कृषी विभाग यांचेमार्फत बियाणे वाटप करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी, नाशिक बी.जी. पाटील यांच्या सहकार्याने मूरघास बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक संजय भांड, कल्पना पाटील, कृषी सहाय्यक जयश्री कुवर, मंडळ कृषी अधिकारी भामरे, नानेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कृषीमित्र विजय आडके यांच्या हस्ते उपस्थित दूध उत्पादक शेतकरी यांना बियाणाचे वाटप करण्यात आले. यावेळी नानेगावचे सरपंच अशोक आडके, उपसरपंच भारती शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, राजाराम शिंदे, लहानू आडके, भिका आडके, अशोक शिंदे, दत्तू रोकडे, मनोहर शिंदे, प्रकाश बेरड, संजय शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक आडके, रवी बोंबले, शरद रोकडे, जनार्दन आडके, संजय आडके, राजाराम रोकडे, दत्तू आडके, सतीश आडके, सतीश भोर, आनंदा चौधरी आदींसह दूध उत्पादक शेतकरी व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. सदरच्या उपक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृषी मित्र विजय आडके यांनी उपस्थित मान्यवर व उपस्थित शासकीय अधिकारी यांचे स्वागत केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!