12 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिक रोड जेल रोड येथील पंचक रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेले प्रिया जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला होता त्यात त्या मृत्युमुखी पडल्या होत्या त्याच रस्त्यावर आज देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे यांचा अपघाती मृत्यू झालाय घटना दुर्दैवी आहे मात्र हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान या रस्त्यात अपघात घडत असतात. सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे यांचा अपघात लष्करी वाहनाने झाला तर परिचारिका जाधव यांचा अपघात एका ट्रकने झाला या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात नाही असे लक्षात येते. नाशिक ट्राफिक पोलिसांमार्फत या रस्त्यावर ट्रॅफिक चे नियोजन ची गरज निर्माण झाली आहे सदरील रस्ता अरुंद असून रस्ता रुंद करण्यात यावा जेणेकरून या ठिकाणी अपघातांचे प्रमाण कमी होईल. रस्त्यावर ट्राफिक पोलिसांचे पेट्रोलिंग हवे. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांसाठी लाल दिव्याची व्यवस्था करण्यात येईल जेणेकरून वाहने भरधाव वेगाने येणार आहे त्यामुळे अपघात टाळणे शक्य होईल. दि हिंद न्यूज सतीश रुपवते नाशिक
.