प्रमोद रहाणे l भगुर :- येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास आणि सेवा केंद्र येथे दि. २० डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२३ दरम्यान श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या आदेशान्वये, परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने, चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाने सोहळा साजरा करण्यात आला. सातही दिवस प्रहर सेवा, गणेशयाग, गीता याग, स्वामी याग्, चंडीयाग, मल्हारी याग, रुद्र याग या सेवा करण्यात आल्या. एकूण २६५ सेवेकरी यांनी गुरुचरित्र पारायण सामुदायिक स्वरूपात पूर्ण केले.
प्रहर सेवा, स्वामी चरित्र, नवनाथ भक्तिसार, श्री दुर्गा सप्तशती, भागवत ग्रंथाचेही पारायण करण्यात आले. श्री रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा यांचे पाठ करण्यात आले. श्री दत्त जयंती निमित्त आयोजित सप्ताह यशस्वीेतेसाठी केंद्र प्रतिनिधी मंगेश बुरके, मधुकर बोराडे, यशवंत मोरे, सुनील ससाणे, सागर बडदे, किरण कापसे, विठ्ठल देशमुख, समाधान सूर्यवंशी, चैतन्य शिंदे, रोहित शिंदे, विकास करंजुले, चेतन सूर्यवंशी, रोहित होळकर, लता थापेकर, संजय सहाने, सुनील साळुंखे, गणेश कासार, बाळकृष्ण वाघ, मधुकर पाळदे, विद्या करंजकर, वैष्णवी वालझाडे, धनंजय वालझाडे, प्रतिभा वाघ, अशोक आहेर आदी सर्व सेवेकरी बंधू ,भगिनी यांनी परिश्रम घेतले. जागतिक कृषी दिनानिमित्ताने आदरणीय आबासाहेब यांनीही सेवेकऱ्याना मार्गदर्शन केले. महाप्रसाद वाटप करुन बुधवारी सप्त्याची सांगता करण्यात आली. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये सर्व सेवेकरी बंधू, भगिनींनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घेतला.