प्रमोद रहाणे l भगूर :- श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्या यांचेतर्फे दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्या येथे श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे जनतेला अक्षतारूपी निमंत्रण दिले जात आहे. संपूर्ण देशात, राज्यात, जिल्ह्यातील गावागावात आयोध्येतून आलेले अक्षता मंगल कलश वितरित करण्यात आले आहे. त्यातील मंगल कलशाची भव्य शोभायात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजेला भगूर मध्ये मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. गायकवाड गल्लीतील श्री मारुती मंदिरात कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीराम, श्री लक्ष्मण, श्री हनुमानाच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथावर कलश ठेवून त्यांची शोभायात्रा भगूर गावच्या सर्व प्रमुख मिरवणूक मार्गावरून पार पडली. विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष एकनाथराव शेटे, देविदास वारुंगसे, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते प्रताप गायकवाड, पदाधिकारी प्रसाद आडके, जीवन गायकवाड, मयूर शेटे, यांच्या हस्ते रथाचे पूजन व श्रीफळ वाढवून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतीश बाजी, पुष्पवृष्टी करण्यात आली. जय श्रीरामचा नारा देत जयघोष करण्यात आला. शोभायात्रेत हिंदू बांधवांसह रामभक्त तसेच कलशधारी महिला भगिनी उस्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतात छत्रपती शिवराय आणि स्वा. वि. दा. सावरकरांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन ह. भ.प. गणेश महाराज करंजकर आणि अशोक लोया यांच्या हस्ते करण्यात आले. गावात ठिकठिकाणी शोभा यात्रेचे स्वागत, मंगल कलशाचे पूजन करण्यात आले. विजय नगरातून शोभायात्रा दुपारी राहुरी, दोनवाडे गावच्या दिशेने मार्गस्थ झाली. शोभायात्रेत गणेश निसाळ, शांताराम शेटे, मधुकर कापसे, चंद्रशेखर ओहोळ, मृत्युंजय कापसे, निलेश हासे, संदीप शेटे, ललित भदे, विशाल शिरसाठ, अनंता कापसे, मंगेश करंजकर, जितेंद्र भावसार, शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप, विक्रम सोनवणे, नितीन करंजकर, प्रमोद घुमरे, महिला भगिनी सौ सरोज गायकवाड, उषा भोर, रूपाली निसाळ, शारदा चौगुले, सारिका शेटे, अनिता गावडे, पौर्णिमा मोहिते, सुवर्णा ठाकरे, ज्योती कापसे, निवेदिता रहाणे, सरोज गायकवाड, कामिनी ठाकूर, श्रद्धा शिरसाट, आदिसह काकासाहेब देशमुख, सुनील जोरे, प्रमोद शेटे, ज्ञानेश्वर गायकवाड, विलास कुलकर्णी, अंबादास पाटील, नारायण आडके, सुनील जाधव, आणि असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.